प्रा. श्रीरंग कुडूपसर |
राजकारणाविषयी उमेशनानांना कळू लागले ते 1972 पासून आणि तेव्हापासूनच ते राजकारणाशी जोडले गेले आहेत. राजकारणात उमेशनानांचे ज्येष्ठ बंधू जयवंतदादा पाटील हे 1972 ला कळवा ग्रामपंचायतीचे उपसरपंच झाले. नंतर पारसिक बँकेचे चेअरमन झाले. उमेशनानांचे काका हरी पाटील हे स्वातंत्र्यसैनिक होते.
त्यांना 1942 च्या आंदोलनात साडेतीन वर्षांचा तुरुंगवास घडला होता. उमेशनानांचे काका, उमेशनानांचे वडील नंतर दशरथदादा हे समाजवादी चळवळीत सक्रिय राहिले. दत्ताजी ताम्हाणे, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, आमदार गौतम पोशा भोईर, राम नाईक, राम कापसे या नेत्यांना उमेशनाना यांनी अगदी जवळून पाहिले आहे.
1978 साली मधू दंडवते याची जाहीर सभा कळव्यात झाली. त्या सभेचे उमेशनाना साक्षीदार आहेत. दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेशनाना यांनी राजकारणातील धडे गिरवले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली उमेशनाना आजही राजकारणात पूर्णपणे क्रियाशीलपणे कार्य करीत आहेत.
उमेशनाना यांचा प्रवास समाजवादी आंदोलनातून सुरू झाला असला तरी उमेशनानांना शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्त्वाचे व शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे लहानपणापासून आकर्षण होते. यामुळेच उमेशनाना यांच्या घरातील वातावरण समाजवादी असूनही ते मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा ऐकायला चालत ठाण्यात जायचे. शिवसेनाप्रमुखांच्या जाज्वल्य विचारांचा उमेशनानांवर तेव्हापासून प्रभाव पडलेला आहे, तो आजवर कायम आहे.
1986 साली दशरथदादा हे जनता दलात सक्रिय होते नगरसेवकही झाले. या वेळी उमेशनाना हे दादांबरोबर सतत सक्रिय असत. यामुळे उमेशनानांनी राजकारण जवळून पाहिले आणि यातूनच त्यांनी राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय घेतला.
उमेशनाना राजकारणात आलो ते समाजवादी वारसा आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा घेऊनच निवडणुकीच्या राजकारणात उतरले. समाजकारण हेच उमेशनाना यांचे ध्येय राहिले आहे. यामुळेच खारीगाव-पारसिक, सह्याद्री, एनएमएम, महात्मा फुलेनगर, आनंद विहार सोसायटी परिसरातील मतदारांनी उमेशनाना यांचे काम पाहून उमेशनाना यांना तीन-तीनदा नगरसेवक म्हणून प्रचंड मताधिक्यांनी निवडणूक दिले आहे, हे याच कारणामुळे. पक्ष निवडणूक लढविण्यापुरता, पण निवडून आल्यावर विरोधी असो व सत्ताधारी सर्व आपलेच मतदार आहेत, या भावनेने पक्ष न पाहता उमेशनाना प्रभागातील नागरी कामे तर करतातच पण मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या, सहकार्यांच्या, हितचिंतकांच्या सुखदुःखातही उमेशनाना सक्रिय सहभागी असतात.
उमेशनाना यांचे राजकारणात सक्रिय होण्याचे कारणच लोकसेवा करणे हे होते. तो लोकसेवेचा यज्ञ उमेशनाना यांनी आजह सतत सजग ठेवलेला आहे. उमेशनाना यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक सदिच्छा!