दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत आणि खारेगाव खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतुकीचा भार वाढून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. साकेत पूल ते मानकोली पुलापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याने ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणार्या नागरिकांचे कोंडीत हाल झाले आहे. ठाण्यात श्रमजीवी संघटनेचा मोर्चा आहे, त्यामुळे या वाहनांचाही भार या मार्गावर वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत आणि खारेगाव खाडे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना येथील वाहन चालकांना सहन करावा लागतो. दुपारी या मार्गावर वाहनांचा भार वाढल्याने साकेत पूल ते मानकोली नायापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.