दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी करीत कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केडीएमसी पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी आढावा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिलेला आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री या स्मारकाला निधी देत राहतील, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि याप्रसंगी व्यक्त केले. स्मारकाच्या ठिकाणी ई लायब्ररी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट टेक्नॉलॉजी माध्यमातून साकरण्यात येणार आहे. डिसेंबरअखेर हे स्मारक बसवण्यात येईल तसेच जयंतीपर्यंत स्मारकाचे लोकार्पण होणार आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.