दिनमान प्रतिनिधी
डोंबिवली।
शहर सौंदर्यीकरण अभियानात आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने डोंबिवलीतील चोळेगाव परिसरात स्वच्छता अभियान राबविले. उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्क भरत पाटील व घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता अधिकारी शरद पांढरे व इतर कर्मचारी तसेच पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाउंडेशन, लक्ष्मी नारायण ट्रस्ट आणि स्वच्छ डोंबिवली अभियान या संस्थांतर्फे आणि स्थानिक स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
चोळेगाव तलाव परिसरात आजूबाजूचे नागरिक निर्माल्य, कचरा टाकत असल्याने जलाव दूषित झाला आहे. त्यासाठी या तलावात कचरा टाकू नये म्हणून नजीकच्या परिसरातील नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला. शंतनू किराणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले, मेघा वैद्य, आदित्य कदम आणि विजय घोडेकर यांनी तलाव परिसरात विविध चित्रे रेखाटली.