दिनमान प्रतिनिधी
विरार|
वसईत बेकायदा ट्रॅटर्संनी धुमाकूळ घातला असून महसूल व वाहतूक विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या व्यवहारात आर्थिक संबध जोपासले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
जमिनीखाली असलेल्या गौण खनिजे, पाषाण, यासह माती सुद्धा शासनाच्या परवानगीशिवाय विक्री केली जाऊ नये असा शासकीय नियम आहे. वसईत मात्र याला थेट तिलांजली देऊन माती विक्रीचा मोठा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. नवीन विकासकामे, इमारती तसेच तलावातील गाळ काढण्याच्या निमित्ताने हजारो ब्रास माती काढली जाते. हि माती लाखो रुपयांना विक्री केली जाते. महसूल नियमानुसार अश्या प्रकारच्या विक्रीला निर्बंध आहेत. आणि विक्री करायची झाल्यास त्याचे स्वामित्व धन (रॉयल्टी) भरूनच व्यवहार करण्याची तरतूद आहे.
परंतु सरकारचा कोट्यावधी महसूल बुडवून अनेक बिल्डर्स, ठेकेदार, माती विक्रीत गुंतलेले व्यावसायिक स्वत:चे उखळ पांढरे करीत आहेत.