दिनमान प्रतिनिधी
डोंबिवली|
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी जाणार्या भक्तांसाठी एसटीची मोफत सेवा पुरविण्यात आली आहे. कोकणात जाणार्या एसटीला खासदार डॉ. शिंदे भगवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. शनिवारी सुमारे ३०० एसटी बसेस सोडण्यात आल्या. शिवसैनिक संदेश पाटील व हरिश्चंद्र पाटील यांनी त्यांच्या प्रभागातील कोकणवासीयांसाठी या एसटी बसेसपैकी ६२ एसटी बसेसची सेवा पुरविण्यास सहकार्य केले. या वेळी खासदार शिंदे यांनी संदेश पाटील यांच्या नियोजनाचे कौतुक केले. कल्याण, डोंबिवलीतून
मोफत बससेवेची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे मैदान, बावन चाळ, डोंबिवली पूर्व आणि ग्रामीणसाठी हभप सावळाराम महाराज क्रीडांगण येथे ही सोय करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बसला झेंडा दाखवून कोकणवासीयांना सुखाचा प्रवास करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, माजी महापौर विनिता राणे, महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, राजेश मोरे, संदेश पाटील, हरिश्चंद्र पाटील, संजय पावशे, माजी नगरसेवक रणजित जोशी, जनार्दन म्हात्रे, राहुल म्हात्रे,सुजित नलावडे, धनाजी चौधरी, स्वाती मोहिते यांसह अनेक अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कल्याण पश्चिमेतूनही शिवसेनेची विनामूल्य बससेवा
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे कल्याण पश्चिमेतील शिवसेना शाखा भवानी नगर येथून देखील कोकणवासीय गणशोत्सवासाठी कोकणात रवाना झाले. या प्रवाशांना कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी भगवा झेंडा दाखवत रवाना केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोकणवासीयांना निश्चित स्थळी जाण्यासाठी खेड दापोली, चिपळूण, गुहागर, माणगाव, महाड, राजापूर, लांजा, रत्नागिरी, देवरूख, मालवण, कुडाळ, वैभववाडी, देवगड, कराड, कोल्हापूर बस सेवेची व्यवस्था करण्यात आली. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी भगवा झेंडा दाखवून ९ बस गाड्या मार्गस्थ केल्या.