डॉ. प्रभाकर आपटे, संजीवनी आपटे | मंदिराच्या परिसरात
ईशादी उपनिषदे आपले वेद, आपली पुराणे या प्रकल्पात समाविष्ट आहेत. म्हणून अथर्व वेदावरचा लेख लिहून झाल्यावर आमच्या संग्रही असलेल्या प्रसाद मासिकाच्या सत्रातून उपनिषदांच्या पाच पुस्तकांतले पहिले ईश-केन-कठ हे पुस्तक काढले व त्यावर लेख तयार करणार तेवढ्यात ते पुस्तक हातातून पडले ते गायबच झाले. त्यावरून मला श्लोक आठवला कार्तवीर्य -अर्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान| यस्य स्मरण मात्रेण गतं नष्टेच विन्दति| पण त्यांचे स्मरण पुनःपुन्हा करूनदेखील ते हातातून खाली पडलेले पुस्तक काही मिळत नाही.
पण त्यावरून एक गमतीशीर किस्सा मात्र आठवला. त्या हजार हाताच्या कार्तवीर्य अर्जुनाचे देऊळ म्हणे ग्वाल्हेरमध्ये आहे, पण स्थानिक लोक सासबहू मंदिरच म्हणतात. वास्तविक सासू-सुनांचा त्या देवळाशी सुतराम संबंध नाही. पण शास्त्रात रुदिर बलीयसी. महाभारतातला तिसरा मांडव आजानुबाहू होता, असे महाभारतात म्हटले आहे. पण हा सहस्रार्जुन म्हणजेच कार्तवीर्य अर्जुन असला तर तो त्रेतायुगापूर्वी परशुरामाच्या काळचा असला पाहिजे.
आपण या लेखासाठी सगळीच उपनिषदे घेऊ या. त्यापैकी पहिल्या खंडात ईश-केन-कठ ही तीन उपनिषदे हरवली. पण ज्या मराठी पुस्तकाचा म्हणजे कवयित्री आसावरी काकडे-माझी पुतणी भारती हिच्या ‘ईशावास्य उपनिषद-एक आकलन-प्रवास’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करतो आहे. त्यातील काही वाये उल्लेखनीय आहेत. आनंद हर्डीकर हे या प्रकाशनाचे प्रकाशक-संपादक आहेत. त्यांनी या प्रस्तावनेचे शीर्षकच ‘प्रकाशकीय भूमिकेतून- हा प्रवास सुंदर आहे,’ असे दिले आहे. हे प्रवासवर्णन म्हणजे travelogue आहे पण चाकोरीबाहेरचे, हे आनंद हर्डीकरांचे वाय अगदी समर्पक आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की हा आकलन-प्रवास कधीही संपणारा नाही, हे भान कविमानाच्या या अभ्यासिकेला आहे. आणि तरीही प्रवासाच्या एका टप्प्यावर आजपर्यंतचं आपलं आकलन उत्साहानं सर्व मित्रांना, चाहत्यांना व वाचकांना सांगतं या अनावर ऊर्मीतून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हीच भावना त्यांनी पुस्तकाच्या समारोप प्रकरणाच्या शेवटी व्यक्त केली आहे. ती अशी – ‘असण्याचं आदिम टोक शोधत अस्तित्वा तुझ्याकडे विघालेय खरी, पण मुक्काम नसलेला हा प्रवास चालत राहणं हीच यांची सांगता.’
‘सापडायचंच नाही म्हणत तू लपलेला राहा आणि सापडणार नाहीस म्हणत मी शोधत राहील.’
केवळ १८ मंत्रांचं ईशावास्य उपनिषद जर एका या २०० पानांच्या पुस्तकाचा विषय होऊ शकतं तर उरलेली दशोपनिषदातील केन इत्यादी उपनिषदं पण एकेक पुस्तकाचा विषय होऊ शकतील का, असं मनात येते. स्वामिनारायणांचे एक पट्ट शिष्य योगिराज गौपालावंद मुनि यांनी श्रीजींच्या आदेशावरून अदशोपनिषदावर त्या काळच्या म्हणजे २०० वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीस अनुसरून संस्कृतमध्ये भाष्य लिहिले. त्याचे भुजचे एक विद्वान संत सत्यप्रसाद स्वामी यांच्या सूचनेवरून इंग्रजीत भाषांतर केले. प्रस्थानत्रयींपैंकी रामानुजाचार्यांच्या गीताभाष्यावरील मुक्तानंद मुनीच्या भाष्याचे भाषांतर श्रीमती सुमन महादेवकर व डॉ.रजनी पतकी या दोन विदुषींनी केलेला आंग्लानुवाद भुजहून प्रसिद्ध झाला. माझे आंग्लानुवाद अजून प्रसिद्ध व्हायचे आहेत. दरम्यान, २५-४-२०२३ मध्ये भुजहून ‘तशवळल ळप ीळिीळीं’ नावाचे पुस्तक भुजहून प्रसिद्ध झाले. त्याचे लेखक आहेत डॉ. सत्यप्रसाद स्वामी. या शीर्षकाखाली सत्यप्रसाद स्वामींनी स्वामिनारायण संप्रदायाचे तत्त्वज्ञान थोडयात मांडले आहे. पूर्वी त्यांनीच लिहिलेले ‘उद्धवसंप्रदायनु तत्त्वज्ञान’ नावाचे छोटे पुस्तक भुजहून प्रसिद्ध झाले आहे. सौ.सुधाताई साठे यांच्या सहकार्याने मी त्याचा संस्कृतानुवाद करू इच्छितो.
असो ईशकेनकठनंतर दुसर्या खंडात ऐतरेय-तैत्तिरीय व प्रश्न अशी तीन उपनिषदे आहेत. ऐतरेय उपनिषद हे ऐतरेय आरण्यकातील ज्ञानकांड आहे, अशी माहिती स. कृ. देवधरांनी सुरुवातीस नोंदली आहे. नंतर त्यांनी इतरेचा पुत्र महीदास याला भूमातेकडून विज्ञानी हो असा वर मिळाला. पुढे त्याने आरण्यकास ऐतरेय आरण्यक व ऐतरेय ब्राह्मण हा ४० अध्यायांचा ग्रंथ लिहिला. १४व्या पानावर संन्यासाचे ७ प्रकार असे १) आतुर, २) कुटीचक, ३) बहूदक, ४) हस, ५) परमहंस, ६) तुरीयानीत व ७) अवधूत. संन्यास घेण्यापूर्वी आत्मश्राद्ध हा विधी करावा लागतो. पूर्वीचे आसुरी श्रीनिवास अय्यंगार हे मेलकोटे मठाधिपति झाल्यावर ‘रामानुज’ अशी सही करीत. वास्तविक त्यांनी आपल्या मुलीचे नाव रामानुजम असे ठेवले होते. मेलकोटेत प्रवेश केल्यावर तो प्रथम भेटला म्हणून मी त्याला विचारलं, ुहशीश ळी र्ूेीी षरींहशी? त्यानं उत्तर दिलं ख हर्रींश पे षरींहशी. कळी आत्मश्राद्ध ळी र्ेींशी. तर ही आपली संस्कृती आहे. पुढे त्यांचे निधन झाल्यावर मेलकोटेच्या स्मशानात त्यांना जिथे पुरले होते तिथे तो पारायण करीत असे. संन्याशांच दहन नाही तर दफन होते.
या उपनिषदाच्या अखेरीस शांती मंत्र दिला आहे. तो असा –
ॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता|
मनो मे वाचि प्रतिष्ठितम्|
आविराविर्म एधि|
वेदस्य म आणीस्थः|
श्रुतं मे मा प्रहासीःनेनाधीतेनाहोरात्रान्सन्दधामि|
ऋतं वदिष्यामि|
सत्यं वदिष्यामि|
तन्मामवतु|
तद्वक्तारमवतु|
अवतु माम्|
अवतु वक्तारामवतु वक्तारम्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
पृ.२२ वर या उपनिषदातील एक मंत्र असा -‘स इमान् लोकान् असृजत.’ त्याचे कोष्ठक पृ.२३ वर आहे.
भूःभुवः… हे ऊर्ध्वलोक ७ व अतल-वितल इत्यादी. अधोलोक ७ मध्ये पृथ्वी. या तीन उपनिषदांपैकी ऐतरेय हे ३ ते ७३ म्हणजे ७१ पानांचे आहे. यात १-३ अध्याय व ५ खंड आहेत. तैत्तिरीय उपनिषद म्हणजे कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय आरण्यकातील ७,८,९,१० हे चार प्रपाठक आहेत. त्यांना पण स्वतंत्र नावे आहेत.
प्रपाठक
७ – शिक्षावल्ली एकूण अनुषाक १२
८ व ९ – ब्रह्मवल्ली ९
१० – भृगुवल्ली १०
त्यानंतर तिसरे प्रश्न-उपनिषद. ते १७२ ते २७१ म्हणजे १०० पानी आहे. हे अथर्ववेदीय आहे.
प्रश्न व मंत्र अशी यांची रचना आहे. ती अशी –
प्रश्नांक मंत्रसंख्या
१ १६
२ १३
३ १२
४ ११
५ ७
६ ८
६७
हे सहावं उपनिषद संपलं. आता ४ उरली. त्यांचा विचार पुढील लेखात करू. तिसरा खंड मुलक व माण्डुय, ४ था बृहद आरण्यक व पाचवा छंदोग्य. ही मोठी व महत्त्वाची आहेत. म्हणून पुढचा लेख व्यापतील.