दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर ।
राज्य शासनाने प्लास्टिक बंदी शिथिल करण्याचा घेतलेला निर्णय हिवाळी अधिवेशनात मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी उल्हासनगरातील एकवटलेल्या महिलांनी आंदोलन करून शासनाला हाक दिली.
प्लास्टिक बंदी शिथिल करण्यात आल्याने पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कागदी पिशव्या बनवून योगदान देणार्या महिलांच्या हाताला काम मिळणे मुश्किल होणार असल्याने हिवाळी अधिवेशनात प्लास्टिक बंदी शिथिल करण्याचा घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी उल्हासनगरातील महिला एकवटवल्या आहेत. कागदी पिशव्या तयार करणार्या असंख्य महिलांनी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ज्योती तायडे आणि सचिव रामेश्वर शेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.