दिनमान प्रतिनिधी
भिवंडी।
ठाणे पोलिसांनी पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला जाफर खान हद्दपारीनंतरही भिवंडीत वास्तव्यास होता. मंगळवारी भिवंडी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथे राहणार्या जाफर खान (23) याला ठाणे पोलिसांनी ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या पाच जिल्ह्यांतून वर्षभरापूर्वी हद्दपार केले होते. त्यानंतरही तो भिवंडी शहरात वास्तव्यास होता. याची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.