दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन ठाणे महापलिकेतर्फे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रीय ध्वजाचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी ठाणे महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तद्नंतर बांगर यांना अग्निशमन दल व सुरक्षा दलाच्या जवानांनी सलामी दिली. दरम्यान, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणार्या १० प्रातिनिधीक सफाई कर्मचार्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पूजनीय नेत्यांच्या प्रतिमांना तसेच शहरातील आदरणीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणार्या लोकशाही पंधरवडा या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.