दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात गुरुवारी कल्याण महापालिकेच्या पथकाने १७ ते १८ टपर्यांवर कारवाई केली. मात्र या जागेप्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. ही कारवाई बेकायदा असल्याचे सांगत नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. केडीएमसीच्या अधिकार्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या धरला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरात एका जागेवर सतरा ते अठरा टपर्यात गेला अनेक वर्षांपासून आहेत. मात्र ही जागा खाजगी मालकीची असल्याचा दावा आता करण्यात आला आहे. आज महापालिकेचे पथक या टपर्यांवर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. या कारवाईला टपरी चालकांनी जोरदार विरोध केला. ही अन्यायकारक बेकादेशीर कारवाई असल्याचे सांगत कारवाई करण्यास गेलेल्या सहाय्यक आयुक्त यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त टपरी चालकांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. गेल्या पस्तीस वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत आहोत या जागेचे भुईभाडे देखील आम्ही देत आहोत आमच्याकडे पावती आहे. ही कारवाई अन्यायकारक आहे बेकायदेशीर आहे असा आरोप या टपरी चालकांनी केला.