दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
दिवसभराच्या ताणतणावातून आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पोलिसांनाही आहाराबरोबर, व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कळवा पोलिसांना अत्याधुनिक व्यायामशाळेचा लाभ मिळाला आहे.
72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कळवा परिसरातील कळवा पोलिसअंतर्गत अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. ठाण्याचे अपर पोलिस आयुक्त अनिल कुंभारे व पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पोलिसांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रत्येक पोलिस ठाण्यात सुसज्ज जिम असणे गरजेचे आहे.