दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
कीर्ती महाविद्यालयामार्फत 26 वी राज्यस्तरीय खो-खो आणि कबड्डी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एसएसटी महाविद्यालयातील महिलांचे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले. यामध्ये सीनियर महाविद्यालय महिला संघाने ज्युनिअर महाविद्यालय महिला संघावरती मात करीत सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून किशोरी मोकाशी, उत्कृष्ट आक्रमक रेश्मा राठोड आणि उत्कृष्ट संरक्षक म्हणून प्रीती हलगरे यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण 25 महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. एकूण 500 च्या वर खेळाडू दोन्ही स्पर्धांसाठी झाले होते. खेळाडूंच्या या यशाबद्दल एसएसटी महाविद्यालयचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, आयक्यूएससी को-ऑर्डिनेटर डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे, तुषार वाकसे तसेच क्रीडा संचालक राहुल अकुल, पुष्कर पवार आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.