दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा कार्यभार पुन्हा अशोक बुरपुल्ले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. स्थावर मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार मनीष जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तसे आदेश जारी केले असून, पालिकेच्या जुन्याच अधिकार्यांकडे कार्यभार देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याकडून अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढून हा विभाग उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र हा विभाग आता पुन्हा अशोक बुरपुल्ले यांच्याकडे पुन्हा देण्यात आला आहे.
अशोक बुरपुल्ले यांना सेवानिवृत्तीसाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, वाघमळे यांच्याकडील स्थावर मालमत्ता विभागाचा अतिरिक्तकार्यभारही उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडे सोपवला आहे. बदलीनंतरही वाघमाळे यांनी त्यांचा अतिक्रमण विभागाचा चार्ज सोडला नव्हता. मात्र सोमवारी नवीन ऑर्डर कडून अतिक्रमणचा अतिरिक्त पदभार बुरपुल्ले आणि स्थावर मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कारभार जोशी यांना सोपवला आहे.