दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
धनगर प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकारणाचा नारा देण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कार्याचा ठसा उमटविणार्या महिलांनी सहभाग घेतला होता.
मकरसंक्रांतीनिमित्त जांभळी नाका, मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करीत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, संगीता संजय हेरवाडे, माजी नगरसेविका पूजा वाघ,सौ वैष्णवी पवार, कविता चव्हाण, भाजपा भटया विमुक्त आघाडी ठाणे शहर महिला अध्यक्ष वर्षा माने, शिवसेना शाखा संघटक अनिता हिलाळ, विभागप्रमुख निकिता कामत, संगीता वनमाने, मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर आदी महिलांची उपस्थिती राहिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर, सचिव गायत्री गुंड, उपाध्यक्ष संगीता खटावकर, उपसचिव अश्विनी पळसे, खजिनदार भारती पिसे, उपखजिनदार सुषमा बुधे, सल्लागार मीना कवितके, रतन वीरकर, सदस्य राजश्री भादेकर, सुजाता भांड, ज्योती कवितके, मनीषा शेळके, शीतल डफळ, सीमा कुरकुंडे आदींनी परिश्रम घेतले.