दिनमान प्रतिनिधी
मुरबाड|
मुरबाडमधील श्रावणी हॉस्पिटलमध्ये एका तीन वर्षांच्या बालकाला ताप आला म्हणून रुग्णालयात दाखल केले होते परंतु त्याच्यावर चुकीचे उपचार झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्या बालकाची प्रकृती श्रावणी हॉस्पिटलमध्ये गंभीर झाल्याने त्याला कल्याण येथील दवाखान्यात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. चुकीचे उपचार करणार्या खासगी श्रावणी हॉस्पिटमधील डॉटर व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी भिमराव भोईर यांनी तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार,मुरबाड नगरपंचायती कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.कारवाई न झाल्यास २ जून रोजी उपोषणाला बसण्याचा इशाराही भोईर यांनी दिला आहे.
मुरबाड तालुयातील वांजळे येथील सम्राट उमेश भोईर (३) या बालकांवर श्रावणी हॉस्पिटलमध्ये चुकीचे उपचार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यामुळे पालकांनी त्याला तात्काळ कल्याण येथे हलविण्यात आले. तेथील तज्ञ डॉटरांच्या उपचारामुळे या बालकाला जीवदान मिळाले. मुरबाडमधील चुकीचे उपचार करणार्या डॉटरवर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाला लेखी पत्र देऊन पालकांनी साकडे घातले आहेत.
सध्या वाढत्या उष्णतेमुळे तापमानात बदल झाल्याने मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. बालकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने डॉटर वेगवेगळ्या प्रकारच्या रक्त तपासण्या करून रुग्णांची लूटमार करत आहेत. शिवाय मुरबाडमधील लॅबमध्ये देखील वेगवेगळे दर असल्याने कोण योग्य तपासणी करतो याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असताना वांजळे येथिल सम्राट उमेश भोईर या बालकाला ताप येत असल्याने त्याला मुरबाड येथील श्रावणी हॉस्पिटलमध्ये नेले.
तेथील डॉटरांनी त्याला तपासले असता रक्ततपासणी करण्यास सांगितले रक्त तपासणीत बालकाला टायफाईडची लागण झाली असल्याचे सांगितले असता डॉटरांनी त्याला डमिट करुन घेतले व तीन दिवस सतत सलाइन सुरू असल्याने बालकाचे शरीराला सूज आल्याचे सांगितले.
ही तक्रार प्राप्त झालेली असून जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे सर्व पेपर पाठवले आहेत. तपासा अंती कारवाई जिल्हा स्तरावरून होईल.
– डॉ.श्रीधर बनसोडे (तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती मुरबाड)
मी कोणतेही चुकीचे उपचार केलेले नाहीत, त्या बालकाच्या नातेवाईकांना उपचार केलेले पेपर त्यांच्या मागणीनुसार सादर केले आहेत.
– डॉ.रामदास पवार (एम.डी, नवजात शिशु व लहान मुलांचे तज्ज्ञ)