दिनमान प्रतिनिधी
ठाणे। शहापूर तालुक्यातील वेहलोली गावात 18 फेब्रुवारी 2022 रोजी एका पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास 100 कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाल्याने बर्ड फ्लू आला आहे, अशी दहशत राज्यभर पसरली आहे. परंतु, बर्ड फ्लूचा संसर्ग पसरत असताना चिकन व अंडीसारख्या पोल्ट्री उत्पादनांचे सेवन करणे थांबवले पाहिजे का? यावर यूएन फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ) व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणांना जारी केलेल्या संयुक्त निवेदनाच्या मते चिकन व इतर पोल्ट्री उत्पादने योग्यरित्या शिजवल्यास खाण्यास सुरक्षित आहेत. पण बर्ड फ्लूने ग्रस्त समूहामधील कोणत्याही कोंबड्यांचा अन्नसाखळीत समावेश करू नये.
शहापूरमधील कोंबड्या वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटल येथील इंटर्नल मेडिसीनच्या संचालक डॉ. फराह इंगळे यांनी बर्ड किंवा एव्हियन फ्लू म्हणजे काय? याचा उलगडा केला आहे. एव्हियन इन्फ्लूएन्झा हा आजार एव्हियन (बर्ड) इन्फ्लूएन्झा (फ्लू) टाइप ए विषाणूंचा संसर्ग झाल्याने होतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेन्शन (सीडीसी)च्या मते जगभरात हा आजार सामान्यत: वन्य जलचर पक्ष्यांत आढळून येतो व स्थानिक पोल्ट्री, इतर पक्षी व प्राण्यांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.
युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रीव्हेन्शन अॅण्ड कंट्रोल (ईसीडीसी)च्या मते एचएसएन8, एचएसएन5 व एचएसएन1 सह एचएसएन8 हे पक्ष्यांमधील सर्वाधिक आढळून आलेले फ्लू विषाणू आहेत. बर्ड फ्लूचा संसर्ग व्यक्तींना पक्षी किंवा पक्ष्यांच्या विष्ठेच्या जवळच्या संपर्काच्या माध्यमातून बर्ड फ्लू संसर्ग होऊ शकतो. काही व्यक्तींना संसर्गित पक्ष्यांची साफसफाई करताना किंवा ने-आण करताना विषाणूचा संसर्ग झाला आहे. व्यक्तींना संसर्गित पक्ष्यांच्या विष्ठेसह दूषित पाण्यात पोहल्यामुळे किंवा आंघोळ केल्यामुळे विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
मनुष्यावर या आजाराचा काय परिणाम होतो?
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेन्शन (सीडीसी) च्या मते एव्हियन फ्लू विषाणूंचा संसर्ग मानवांना होत नाही आणि असा संसर्ग दुर्मिळ आहे. मायो क्लिनिकच्या मते, 2015 पासून काही तुरळक केस आढळून आल्या आहेत. पण व्यक्तीलला या आजाराचा संसर्ग झाला तर आजार अत्यंत सौम्य असतो.
काही रुग्णांना आयसीयूची गरज भासू शकते. हा आजार एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याचे प्रमाण दुर्मिळ आहे. 2003 ते 2019 दरम्यान डब्ल्यूएचओने जगभरात एचएसएन1 च्या 861 मानवी प्रकरणांची पुष्टी दिली. ज्यापैकी 455 जणांचा मृत्यू झाला. पण भारतामधून मृत्यूसंदर्भात नोंदणी नाही.
मनुष्यात बर्ड फ्लूच्या काही सामान्य लक्षणांत खोकला, ताप, घसा खवखवणे, स्नायूदुखी, डोकेदुखी व श्वास घेताना त्रास होणे. बर्ड फ्लू होणार्या व्यक्तींना जीवनास धोकादायक आजार होऊ शकतात. जसे न्यूमोनिया, पिंकी (कॉन्जेक्टिव्हायटीस), श्वसनक्रिया बंद होणे, किडनी बिघडणे आणि हृदयविषयक आजार.
या उत्तम आरोग्यदायी सवयी
क्रॉ-कन्टेमिनेशन टाळा.
चिकन साफ करताना व तयार करताना ग्लोव्ह्ज घालणे
कटिंग बोर्डस्, भांडी व कच्च्या पोल्ट्रीच्या संपर्कात आलेले पृष्ठभाग स्वच्छ धुण्यासाठी गरम, साबणाच्या पाण्याच्या वापर करणे
चिकन उत्तमरित्या शिजवा-रस्सा तयार होईपर्यंत चिकन शिजवा ( किमान 30 मिनिटे) व किमान इंटर्नल तापमान 165 फॅरेड (74 अंश सेल्सिअस) ठेवा.
कच्ची अंडी खावू नका- कच्ची किंवा कमी शिजवलेली अंडी असलेले अन्न टाळा, अंड्याचे कवच कोंबड्यांच्या विष्ठेमुळे दूषित होतात
घरी सेवन करण्यासाठी प्रीकट किंवा फ्रोजन केलेले चिकन निवडा