दिनमान प्रतिनिधी
डोंबिवली|
डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर साड़ेअठरा वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बुधवारी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी अत्याचार करणार्या तरुणास अटक केली आहे. हा तरुण अल्पवयीन मुलीस धमकी देत होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाललैंगिक अत्याचार कायद्याने हिमांशू राजू बामणे या तरुणावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत तरुणाने पीडितेवर लैगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगी व तरुणाची मैत्री झाली होती. दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. तरुणाने पीडितेकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तरुणाने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैगिक अत्याचार केले. काही दिवसांनी पीडितेला समजले की तरुणाची वर्तणूक ठीक नाही. यामुळे तिने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तरुणाने पीडितेच्या शाळेजवळ, घराजवळ, लासजवळ भेटून तर कधी मोबाइलवर धमकी देण्यास सुरुवात केली. तू माझ्याशी संबंध ठेव नाहीतर माझ्याकडील तुझी अश्लील छायाचित्रं मी तुझ्या पालकांना दाखवीन, अशी धमकी तरुणाने दिली. पीडितेने हा प्रकार घरी सांगितल्यावर घरच्यांनी तरुणाविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.