दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
अण्णा लीला कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स येथील महिला विकास समिती व राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. टिटवाळा येथील विनायक मार्शल आटर्स आणि फिटनेस झोनच्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण सर्व युवतींना दिले गेले.
आत्मसंरक्षण हीच काळाची गरज आहे. समाजात वावरणार्या विघातक प्रवृत्तीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयात महिला विकास समितीअंतर्गत सर्व महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे शिबीर राबवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या प्रशिक्षणासाठी या महाविद्यायातील सुमारे १०० युवतींनी सहभाग नोंदविला.
विनायक मार्शल आटर्स आणि फिटनेस झोनचे प्रशिक्षक आणि जिल्हा युवा पुरस्कार विजेते हरीश वायदंडे तसेच महिला प्रशिक्षिका प्रिया उमरवैष्य आणि नेहा उमरवैष्य यांनी अण्णा लीला महाविद्यालयातील युवतींना आत्मसंरक्षण प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात वाईट कृत्यांपासून बचावासाठी आवश्यक महत्त्वाच्या युक्त्या शिकवण्यात आल्या.