• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home ठाणे विशेष

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण नाना शंकरशेट टर्मिनस करा

ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे पंतप्रधानांच्या अनुमतीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक

प्रतिनीधी by प्रतिनीधी
March 16, 2023
in ठाणे विशेष
0
पाठपुरावा

पाठपुरावा

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनमान प्रतिनिधी

ठाणे।

भारतीय रेल्वेचे जनक व आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे. या मागणीसाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार, प्राप्त निवेदनावर तातडीने शेरा मारून पंतप्रधानांच्या अनुमतीसाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी दिली.

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरण करण्यासाठी दैवज्ञ समाज तसेच नाना शंकरशेट प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने 20 मार्च 2020 रोजी नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यानंतर राज्यातील अनेक खासदारांनी केंद्र सरकारला निवेदने दिली. समाजाच्या पदाधिकार्‍यांनी संबंधित मंत्री, रेल्वे अधिकारी यांची भेट घेतली होती. त्या अनुषंगाने तत्कालीन रेल्वे उपसंचालकांना नामकरण करण्यासंदर्भात नियमानुसार कार्यवाहीचे निर्देशही रेल्वे राज्यमंत्री यांच्या कार्यालयाने दिले होते. मात्र, आजतागायत या नामांतराचे घोंगडे भिजत पडले आहे.

जगन्नाथ उर्फ नानाशंकरशेट हे मुळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील असून ते ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत तसेच त्यांचे काही काळ वास्तव्य व येणे जाणे घोडबंदर रोड गावामध्ये होते, तिथे त्यांचा जुना वाडा आणि त्यांनी स्थापन केलेले शंकराचे मंदिरही आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या या सुपुत्राचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे. तसेच, राज्य सरकार व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. असा शेरा मारला आहे.

मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली धावली. या रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाणारे नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनस ला देण्यात यावे. या मागणीसाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे.

Tags: आधुनिकजनकठाणे जिल्हा पत्रकार संघनावनिवेदनपाठपुरावाभारतीय रेल्वेमागणीमाहितीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुंबईमुंबई सेंट्रल टर्मिनसशिल्पकार नाना शंकरशेट
Previous Post

घोडबंदर रोडचे नामांतर करा !

Next Post

पुढील पाच दिवस पावसाची शक्यता

Next Post
शक्यता

पुढील पाच दिवस पावसाची शक्यता

No Result
View All Result

Recent Posts

  • अंबरनाथ केमिकल कंपनीत स्फोट
  • खा. श्रीकांत शिंदेंवरील टिपण्णीनंतर शिवसैनिक आक्रमक
  • आक्षेपार्ह टिपण्णी करणारे रडारवर!
  • मुंबई, ठाण्यासह राज्यभर आनंदसरींचे वारे
  • दीपालीला रंगभूमी खुणावतेय

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist