दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई ।
गावी जाण्यासाठी उर्वरित पगाराची मागणी करणार्या सुताराला मुकादम आणि त्याच्या इतर साथीदारांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता सुताराला इमारतीच्या तिसर्या माळ्यावरून खाली ढकलून दिले. सुदैवाने तो वाचला. याप्रकरणी मुकादम आणि इतर चौघांविरोधात हत्येचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अखिलेश चौरसिया, रामशरण निषाद अशी आरोपींची नावे असून, या व्यतिरिक्त दोघांची ओळख पटलेली नाही. एकूण चार आरोपी आहेत. अमरपाल निषाद असे तक्रारदाराचे नाव आहे.