दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
ठाणे जिल्ह्यातून मध्य रेल्वेचे लोहमार्ग जात असून, त्याचा काही भाग ठाणे व कल्याण तालुक्यातील खाडी क्षेत्रातून जातो. या मार्गालगत लोहमार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील रेल्वे पूल व रस्ते पुलांच्या कोणत्याही बाजूने 600 मीटर्स अंतरात वाळू उत्खनन होणार नाही, त्याकरिता 20 नोव्हेंबर रोजी रात्री 12.01 पासून ते 18 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे. अवैध वाळू उत्खननाबाबत गणेश नीळकंठ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात येथे क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी जिल्हाधिकारी, ठाणे येथे 29 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील महसूल, महाराष्ट्र सागरी मंडळ, पोलिस यंत्रणा व रेल्वे विभागांशी विचारविनिमय करून अवैध रेती उत्खनन व लोहमार्गास होत असलेला संभाव्य धोका लक्षात घेता अभियांत्रिकी स्वरूपाच्या उपाययोजनेंतर्गत लोहमार्गालगत गॅबियन बंधारे बांधण्याचे काम प्रगतिपथावर असून अन्य बंधारेही प्रस्तावित आहेत.