सूरज सामंत | अर्थभान
देशातील पॉलिगामी सर्वाधिक असणार्या ४० जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचे शिक्षण, धर्म, आदिवासी लोकसंख्या यासारख्य विविध निकषांवर आधारित अभ्यास करण्यात आला, परंतु निश्चित असे कोणतेही एक कारण दिसले नाही. छकऋड ने याचा संबंध मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थिती, स्त्री शिक्षण यासारख्या आर्थिक व सामाजिक घटकांसोबत जोडला आहे. देशातील एकमेव मुस्लिमबहुल राज्य काश्मीर मध्ये पॉलिगामीचे एकूण प्रमाण ०.३% आहे. आसाममध्ये मुस्लिम धर्मीयांमध्ये, कर्नाटकमध्ये हिंदू धर्मियात तर मेघालय मध्ये इतर धर्मीयांमध्ये राज्यांतर्गत पॉलिगामीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
जगात सर्वात वेगाने वाढणारे धर्म आहेत इस्लाम, ख्रिस्ती आणि मग हिंदू. आश्चर्य वाटेल पण त्यामागोमाग आहे ज्यू. परंतु जगाच्या लोकसंख्येमध्ये सर्वात वाढणारा हिस्सा आहे नास्तिकांचा. गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये ध्रुवीकरण हा राजकारणाचा आणि माध्यमांचा मुख्य हेतू बनला असावा अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये योग्य माहिती पारदर्शकपणे जनतेपर्यंत पोचवली जात नाही. परीणामी समाजातील गटांमधील दरी वाढत जात आहे. लोकसंख्या वाढ हा त्यासंबंधित एक विषय. लोकसंख्या वाढीची कारणे म्हणवत अधिक अपत्य जन्माला येणे व एकाहून अधिक विवाह करणे यांचे संबंध ठराविक गटांशी जोडून अनेक गैरसमज पसरवले जातात पण दुसर्या बाजूला देशाच्या अर्थमंत्री ‘लोकसंख्या वाढ’ या निकषानुसार सर्व काही आलबेल आहे हे असे समजतात. म्हणून हा विषय योग्य आकडेवारीने समजून घेणे हा या लेखाचा उद्देश.
अधिकृतरीत्या १५ ते ४९ या वयोगटातील महिलांचे ज्या व्यक्तीसोबत लग्न झाले आहे त्या व्यक्तीचे एकाहून अधिक स्त्रीयांसोबत सोबत वैवाहिक संबंध असणे याला म्हणतात पॉलिगामी. पॉलिगामी म्हणजे बहुपत्नीत्व. मुस्लिम धर्मात याला परवानगी आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, इराण, इजिप्त या मुस्लिम बहुल व मुस्लिम देशात बहुपत्नीत्वाची परवानगी असून देखील एकाहून अधिक पत्नी असणार्यांची संख्या १% पेक्षा कमी आहे. भारतात देखील मुस्लिम व्यक्तींना कायदेशीर परवानगी आहे जी इतर धर्मियांना नाही. हिंदू मॅरेज ऍट नुसार त्यासाठी शिक्षा आहे. १९९१ मधील जनगणनेमधील आकडेवारीनुसार बहुपत्नीत्व / एकाहून अधिक लग्न करण्याची पद्धत प्रचलित असण्याचे प्रमाण सर्वाधिक आदिवासी समुदायात (१५.२५%) होते. त्या पाठोपाठ बौद्ध (७.८%) जैन (६.२७%), हिंदू (५.८०%) तर मुस्लिम धर्मियात (५.७०%) होते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेने
केलेल्या सर्वेक्षणातून काही आकडे समोर येतात, त्यानुसार भारतात बहुपत्नीत्वाची टक्केवारी सातत्याने कमी होत आहे. १५ ते ४९ वयाच्या लग्नांमध्ये एकूण बहुपत्नीत्वाची संख्या २००५/०६ मध्ये १.९% होती जी २०१९/२० मध्ये १.४% झाली. ईशान्येकडील राज्यांमध्ये विशेषतः आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या मेघालय मध्ये ती ६.१% तर त्रिपुरामध्ये २% प्रमाण आहे. २०१९/२० मध्ये पॉलिगामीची आकडेवारी हिंदू १.३%, मुस्लिम १.९%, ख्रिश्चन २.१% (ईशान्येकडील आदिवासींच्या संख्येमुळे असावी) इतर २.५% आहे. याचा अर्थ कायदेशीर असूनही मुस्लिम धर्मियात एकाहून अधिक लग्न करणार्यांची संख्या १.९% आहे तर बेकायदेशीर असूनही हिंदूंमध्ये १.३% इतके प्रमाण आहे. सामाजिक घटकांचा अभ्यास केला असता अनुसूचित जमातींमध्ये ही संख्या अधिक आहे परंतु त्या टक्केवारीमध्ये देखील घट होत आहे. २००५/०६ मध्ये ३.१ टक्के इतकी असणारी संख्या २०१९/२० मध्ये अर्ध्याहून कमी होऊन १.५ टक्के झाली. ढोबळमानाने बहुपत्नीत्व हिंदूंपेक्षा मुस्लिम धर्मीयांमध्ये अधिक दिसून येते परंतु छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू याला अपवाद आहेत. बहुपत्नी असणार्यांची संख्या सर्वात जास्त गरीब,अशिक्षित, ग्रामीण व वयस्कर भारतीयांमध्ये आढळून येते.
देशातील पॉलिगामी सर्वाधिक असणार्या ४० जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचे शिक्षण, धर्म, आदिवासी लोकसंख्या यासारख्य विविध निकषांवर आधारित अभ्यास करण्यात आला, परंतु निश्चित असे कोणतेही एक कारण दिसले नाही. छकऋड ने याचा संबंध मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थिती, स्त्री शिक्षण यासारख्या आर्थिक व सामाजिक घटकांसोबत जोडला आहे. देशातील एकमेव मुस्लिमबहुल राज्य काश्मीर मध्ये पॉलिगामीचे एकूण प्रमाण ०.३% आहे. आसाममध्ये मुस्लिम धर्मीयांमध्ये, कर्नाटकमध्ये हिंदू धर्मियात तर मेघालयमध्ये इतर धर्मीयांमध्ये राज्यांतर्गत पॉलिगामीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मेघालयमधील ईस्ट जैंतिया हिल्स या जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक २०% आहे. तर सर्वाधिक दर असणार्या चाळीस जिल्ह्यांच्या तळाशी मध्यप्रदेश मधील अणुपुर आहे जिथे ३.९% इतका दर आहे. तसेच लहान वयात लग्न होण्याचे मुलींचे प्रमाण या निकषावर छऋकड म्हणते कि हिंदू व मुस्लिम धर्मियांत हे प्रमाण जवळपास सामान आहे. लग्न होण्याचे मुलींचे सरासरी वय हिंदू व मुस्लिममध्ये १८.७ आहे तर शीख २१.२, ख्रिश्चन २१.७ व जैन २२.७ आहे. बर्याचदा या समस्येचे मूळ शिक्षण समजले जाते व शिक्षणात मुस्लिम स्त्रिया मागे असण्याची शयता व्यक्त होते. कारण तालिबान सारख्या कट्टर मुस्लिम राजवटीत मुलींच्या शाळा सर्वात आधी बंद केल्या जातात. परंतु ही समस्या केवळ मुस्लिम धर्मियांची नसून त्याचा संबंध कट्टरतेशी जोडता येऊ शकतो. जगभरातील देशांचा अभ्यास करता दिसून येते की, कट्टर धार्मिकतेचा पहिला आघात स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर होतो. छऋकड अहवालानुसार मुस्लिम स्त्रिया/ मुली सरासरी ४.३ वर्ष शिक्षण घेतात तर पुरुष ५.४ वर्ष. म्हणजे मुली व मुलांमधील दरी १.१ वर्षाची आहे. हिंदू मुलींची सरासरी ४.९ वर्षाची आहे तर पुरुषांची ७.५ वर्षे. हिंदू मुलींचे सरासरी शिक्षण मुस्लिम मुलींपेक्षा थोडे जास्त आहे परंतु स्त्री पुरुष दरी (२.६ वर्षे) देखील तुलनेने अधिक आहे.
१९५१ साली देशात पहिली जनगणना झाली तेव्हा मुस्लिम होते ३.५ कोटी, हिंदू होते ३० कोटी, एकूण भारतीय लोकसंख्या ३६ कोटी आणि जगाची एकूण २६० कोटी. साठ वर्षानंतर २०११ साली, मुस्लिम १७ कोटी (१४%) हिंदू ९७ कोटी (८०%) एकूण भारतीय १२५ कोटी आणि जगाची लोकसंख्या एकूण ७०० कोटी होती. म्हणजे भारतात हिंदू लोकसंख्या चार टक्के कमी झाली तर मुस्लिम चार टक्के वाढली. देशातील मुस्लिम लोकसंख्येची टक्केवारी १९५१ पासून आतापर्यंत वाढली आहे हे सत्य असले तरी त्याचा बाऊ करणे अयोग्य आहे.
कारण १९५१ साली जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंची संख्या ११.७५% होती. तर २०२३ मध्ये हिंदूंची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १५% आहे. याउलट काही धर्मियांची लोकसंख्या कमी झाली आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे ५ च्या सर्वेक्षण व अहवालानुसार, मुस्लिम प्रजनन दर ४.४ वरून २.६ वर आला आहे. (४०.८% घट ) हिंदू प्रजनन दर ३.३ वरून २.१ वर आला. (३६.३ %), ख्रिस्ती (३१% घट ), बौद्ध (४१% घट), सिख (३३% घट) आणि जैन (५०% घट) नोंदवली गेली आहे. देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण दाक्षिणात्य राज्यात कमी आहे आणि उत्तर प्रदेश व बिहार मधे ते सरासरीच्या दीडपटहुन अधिक आहे. मुस्लिमबहुल काश्मीर मधला प्रजनन दर (अंदाजे १.६) हा राष्ट्रीय प्रजनन दरापेक्षा (२.०) कमी आहे. तर उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांचा अनुक्रमे २.४ आणि ३.० आहे.
मलेशियासारख्या काही मुस्लिम देशात प्रजनन दर हा भारतापेक्षा कमी आहे. जगातील सर्वाधिक प्रजनन दर असणारे देश अत्यंत गरीब आहेत. उदाहरणार्थ निगेर, सोमालिया, काँगो, माली, चाड, अंगोला, बुरुंडी, नायजेरिया, गांबिया व बुर्किना हे सर्वाधिक प्रजनन दार असणारे दहा देश आहेत, तर सर्वात कमी प्रजनन दर असणारे देश आहेत स्पेन, पोर्तुगाल, जपान, दक्षिण कोरिया, बल्गेरिया, तैवान, ग्रीस इत्यादी.
जनगणनेतील आकडेवारीनुसार, विभक्त झालेल्या आणि सोडून दिलेल्या स्त्रियांची भारतातील संख्या आहे तेवीस लाख. त्यातील वीस लाख (८७%) हिंदू आहेत, दोन लाख ऐंशी हजार (१२%) मुस्लिम आहेत. प्यू रिसर्च अहवालानुसार भारतात ९९ टक्के हिंदु विवाह हिंदुंशीच होतात. ९८ टक्के मुस्लिम विवाह मुस्लिमामध्येच होतात. बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम लोकांचे जवळचे मित्र त्यांच्याच धर्मातले असतात. शेजारी सुद्धा त्यांच्याच धर्मातले असतात. देशात किंवा भारतातील विविध राज्यातल्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास दिसून येते की, लोकसंख्या वाढ ही समस्या फक्त धार्मिक नसून त्याचा शिक्षणाशी व स्त्री स्वातंत्र्याची संबंध आहे. त्यामुळे जर लोकसंख्यावाढ नियंत्रित करणे अथवा लोकसंख्येचा योग्य दर राखणे हा प्रामाणिक हेतू असेल तर, अधिकाधिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करायला हवा. व त्यासाठी अधिकाधिक मुलींना शाळेकडे आकर्षित करावे लागेल.
(लेखक व्यवसायांना स्ट्रॅटेजीबाबत सल्ला देतात.) [email protected]