दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
उत्तर भारतीय बांधव भगिनींचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे छट पूजा सर्वत्र साजरा केला जातो. कल्याणातही मोठ्या उत्साहात छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे भारतीय संघाचा टी-शर्ट घालून रोड शो करीत छटपूजेत सहभागी झाले होते त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सध्याचे सरकार बैलगाडा शर्यतीसारखे आहे, असे केलेल्या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवीत अमोल कोल्हे यांनी येणार्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक कशी जिंकणार, याकडे लक्ष दिले पाहिजे, असा टोला डॉ. शिंदे यांनी लगावला.
महायुतीचे सरकार शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम सरकार करत आहे. शेतकर्यांना याच्या अगोदर जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते किंवा कोणाचेही असेल शेतकर्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम यांनी केले. हे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी पहिल्यादा साडेबारा हजार कोटी रुपये देण्याचे काम सरकारने केले.