दिनमान प्रतिनिधी
मिरा भाईंदर।
सिटिझन पर्सेप्शन सर्व्हेमध्ये मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी केले आहे. देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा केंद्र शासनाने आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये एक लाख लोकसंख्या व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणार्या शहरांचा समावेश आहे. इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स स्पर्धेत नागरिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. मिरा भाईंदर महापालिकाही या स्पर्धेत सहभागी झाली आहे.
मिरा भाईंदर महापालिका शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत आहे. महापालिकेने आतापर्यंत विविध प्रकल्प शहरात राबविले आहेत. उत्तम रस्ते, उत्तम आरोग्य सुविधा, उत्तम उद्याने, उत्तम शिक्षण अशा विविध सेवा देण्यासाठी महापालिका अहोरात्र मेहनत घेत असते. येत्या काळात महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना अत्याधुनिक रुग्णालये, खेळाची मैदाने, क्रिकेट अकॅडमी असे महत्वपूर्ण प्रकल्प व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.