कालानुरूप बदल आणि गतिमान तसेच सुसह्य सेवा देण्यात टीएमटी ही अपुरी पडत असली तरी फुगत आणि विस्तारीत चाललेल्या या शहराला सार्वजनिक सेवांची किती आवश्यकता आहे हे वारवार दिसून येते. स्वताची दुचाकी अथवा चार चाकी घेऊन दररोज वाहतूक कोडीच्या मार्यात आणि प्रदूषणाच्या फेर्यात जाणे हे अनेकजण टाळतात. त्यांना परिवहन सेवा अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय राहतो. असे असूनही ठाणे महापलिका परिवहन सेवा ही त्यासाठी खूपच अपुरी पडत आहे. याचा अर्थ प्रवासी आहेत पण बस नाहीत. नेमका हाच मुद्दा आर्थिक पाहणी अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आला आहे. इथे एक बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे मागील वर्षाच्या पाहणी अहवालाचा. सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देणार्या बहुसंख्य परिवहन सेवा तोट्यामध्ये सुरू असून त्यामध्ये ठाणे परिवहन राज्यात तिसर्या क्रमांकावर आहे. नवी मुंबई पाचव्या, कल्याण-डोंबिवली सातव्या, तर मिरा-भाईंदर आठव्या स्थानावर आहे. वसई-विरार महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने तोट्याचे आकडे दिले नव्हते असा हा पाहणी अहवाल सांगतो.
राज्यात असलेल्या महापलिका परिवहन सेवांची अवस्था गेल्या काही काळात अक्षरक्ष खस्ता झालेली असल्याचे चित्र दिसते. यामध्ये ठाणे महापालिका प्रविव्हन सेवेचा सुद्धा समावेश आहे. तोट्यात चालणारी सेवा आणि महापालिकेला पांढरा हत्ती ठरत असलेली ही सेवा चालवायची कशी असा प्रश्न अनेक पालिकासमोर आजही आहेच. मुंबई सह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईदर, पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर, वसई- विरार, कोल्हापूर, सोलापूर या महापालिका परिवहन सेवांचा उल्लेख इथे प्रातिनिधिक ठरते. दररोज तोट्यात चालणार्या या सेवा काही ठिकाणी शेवटच्या आचके घेत आहेत.ठाणे महापालिका सेवा ही तोट्यात असली तरी गेली काही वर्षे ती आचके खात सुरूच आहे. कालानुरूप बदल आणि गतिमान तसेच सुसह्य सेवा देण्यात टीएमटी ही अपुरी पडत असली तरी फुगत आणि विस्तारीत चाललेल्या या शहराला सार्वजनिक सेवांची किती आवश्यकता आहे हे वारवार दिसून येते. स्वताची दुचाकी अथवा चार चाकी घेऊन दररोज वाहतूक कोडीच्या मार्यात आणि प्रदूषणाच्या फेर्यात जाणे हे अनेकजण टाळतात. त्यांना परिवहन सेवा अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय राहतो. असे असूनही ठाणे महापलिका परिवहन सेवा ही त्यासाठी खूपच अपुरी पडत आहे. याचा अर्थ प्रवासी आहेत पण बस नाहीत. नेमका हाच मुद्दा आर्थिक पाहणी अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आला आहे. इथे एक बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे मागील वर्षाच्या पाहणी अहवालाचा. सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देणार्या बहुसंख्य परिवहन सेवा तोट्यामध्ये सुरू असून त्यामध्ये ठाणे परिवहन राज्यात तिसर्या क्रमांकावर आहे. नवी मुंबई पाचव्या, कल्याण-डोंबिवली सातव्या, तर मिरा-भाईंदर आठव्या स्थानावर आहे. वसई-विरार महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने तोट्याचे आकडे दिले नव्हते असा हा पाहणी अहवाल सांगतो. आणि तब्बल दोन वर्षांनी याच पाहणी अहवालात ठाणे महापालिका ही प्रवासी संख्येत तिसर्याच क्रमांकावर असून बसेसची संख्या मात्र खूपच कमी आहे असे नमूद करण्यात आल्याने ही प्रगती की अधोगती हे राजकीय सोयीनुसार ठरवले जाईल. शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परिवहन सेवा सुरू करण्यात येत असली, तरी ती तोट्यामध्ये चालवण्याशिवाय प्रशासनाला पर्याय उरलेला नाही. सर्वाधिक तोटा दररोज 21 लाख प्रवाशांना वाहतूक सेवा देणार्या बृहन्मुंबई महापालिकेच्या बेस्ट प्रशासनाचा आहे. यातील चिंतेची बाब म्हणजे हीच प्रवासी संख्या दोन वर्षापूर्वी 25 लाख होती आता त्यामध्ये चार लाखांची घट झाली आहे. दैनंदिन साडे पाच लाख प्रवाशांना सेवा देणार्या पुणे महानगरपालिका परिवहन सेवेचा तोटा असला तरी गेल्या वर्षभरात प्रवासी संख्येत भरघोस म्हणजे दुपटीने वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी दोन लाख प्रवासी उपलब्ध असणार्या या सेवेचा लाभ सध्या पाच लाख प्रवासी घेतात. ही अभिनंदनीय बाब असली तरी तोट्यात घट नाही. बसेसची अत्यंत सुमार अवस्था ही कायम राहिली आहे.ठाणे महापालिका परिवहन सेवा ही आता या अहवालानुसार पावणे दोन लाखांच्या आसपास प्रवासी उपलब्धतेच्या जोरावर तिसर्या क्रमांकावर असली तरी बसेस च्या संख्येत नेहमीच घट झाली असून तोटा हा कायम पाचविलाच पूजलेला आहे. परिवहनच्या ताफ्यात 227 बसेस असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर दीडशे च्या असपासच बसेस धावतात. अन्य बसेस या नादुरुस्त अवस्थेत आगारात उभ्या असतात. हीच अवस्था कल्याण- डोंबिवली, मीरा भाईंदर या सेवांची आहे. तोट्याचा डोंगर दरवर्षी वाढतच असताना या परिवहन सेवेला उर्जितावस्था देण्याचा प्रामाणिक प्रयत्न अपवादानेच दिसतो. राजकीय खेळात या सेवांची धूळधाण करण्याचा उद्योग नेते मंडळीकडून कायमच केला गेला आहे. सध्याच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात या सेवांनी कात टाकून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी यातील राजकीय हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. सध्या टीएमटी च्या ताफ्यात काही वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून आणखी काही लवकरच दाखल होतील. ही समाधानाची बाब आहे कारण यातून शून्य प्रदूषण आणि बसेसची मुबलक उपलब्धता होऊ शकते. तोट्यात चालणारी काही मार्ग त्वरित बंद करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीना खुश करण्यासाठी कोणतीही व्यावहारिक तपासणी न करता हे मार्ग सुरू असून ते गेली अनेक वर्षे तोट्यात आहेत. जेमतेम प्रवासी घेऊन बस धावत असतात असे चित्र नेहमीच दिसते. त्यासाठी हे राजकीय लाड कायमचे बंद केले तरच काही प्रमाणात तोटा भरून निघू शकतो तसेच जादा प्रवासी भारमान असलेल्या मार्गावर या बसेस कायम उपलब्ध होऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच वातानुकूलित बसेसच्या तिकीट दरात कपात करण्यात येणार असल्याने त्याचा फायदा प्रवासी वाढीसाठी जरूर होऊ शकतो. बोरिवली मार्गावर परिवहन सेवेला सर्वाधिक प्रवासी उपलब्ध होत असून त्यात आणखी वृद्धी अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त ठाणे बाहेर अन्य ठिकाणी सेवेचा विस्तार झाल्यास प्रवासी वाढू शकतात. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीमुळे टीएमटीला 80 कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.शहरातील 28 लाख नागरिकांसाठी अवघ्या 333 बसेस उपलब्ध आहेत. यातील टीएमटीच्या फक्त 150 बसेस असून उर्वरीत कंत्राटी बसेस आहेत. ही तूट भरून काढण्यासाठी 45 स्टॅण्डर्ड बसेस व 16 मिडी बसेस अशा एकूण 71 वातानुकूलित बसेस तसेच 10 स्टॅण्डर्ड बसेस व 42 मिडी बसेस अशा एकूण 52 सर्वसाधारण बसेस टप्याटप्याने दाखल होण्याची घोषणा करण्यात आली आहे तसेच वातानुकूलित 26 मिडी बसेस व शहरांतर्गत उर्वरित 45 स्टॅण्डर्ड बसेस येतील. इलेक्ट्रिक बसेस आल्यामुळे जुन्या झालेल्या डिझेल बसेस निकाली काढणे शक्य होईल, त्यामुळे परिवहन सेवेला होणारा तोटा कमी करणे शक्य होईल. तसेच इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून नवीन बसेस येत असल्यामुळे नागरिकांनाही सुखकारक प्रवास उपलब्ध करुन देणे शक्य आहे. हे सर्व पाहता ठाणे शहर आणि विस्तारीत उपनगराचा विचार केल्यास किमान 28 लाखांच्या लोकसंख्येसाठी मुबलक बसेसची उपलब्धता ही पुढील काही काळात प्रवासी भारमान वाढीसाठी एक मोठी संधी ठरू शकते. या संधीचा योग्य आणि अचूक वापर करून घेणे आवश्यक आहे.