• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home संपादकीय

ऑनलाइन डेटिंग : अ‍ॅप्सचे मायावी जग!

प्रतिनीधी by प्रतिनीधी
November 26, 2022
in संपादकीय
0
डेटिंग

डेटिंग

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टीम बाईमाणूस |

शद्धा वालकरच्या हत्येनंतर देशभर बम्बल, ट्विटर यांसारख्या अ‍ॅप्सबाबत एक भीती पसरली आहे. ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सच्या विश्वात प्रवेश करण्याआधी हे वाचायलाच हवे…

प्रत्येक वेळी भारतातील एखादी महिला डेटिंग अ‍ॅपवर स्वाइप करते तेव्हा तिच्या निर्माण होणार्‍या उत्साह आणि पल्लवित झालेल्या आशा यांच्यामध्ये एक अनामिक भीती दडलेली असते. श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आता ती भीती अधिकच गडद झाली आहे. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याला तिच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून त्याने ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. श्रद्धा आणि आफताबची भेट बम्बल नावाच्या एका डेटिंग अ‍ॅपवर झाली होती.

पण डेटिंग अ‍ॅपच्या अचानक वाढलेल्या भीतीमागे श्रद्धाची झालेली हत्या अथवा तिच्या शरीराचे करण्यात आलेले तुकडे हेच कारण नसून, तिच्या शरीराचे अवयव फ्रीजमध्ये ठेवलेले असतानाही आफताबने आणखीन एका मुलीला त्याच्या घरी डेटवर बोलावणे यामुळे ही भीती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही घटना महिलांना डेटिंग अ‍ॅप्सवरील त्यांच्या भागीदारासोबत त्यांना आलेला अनुभव नोंदविण्याचा सुविधेकडे लक्ष देण्यास भाग पाडते आहे.

आणखीन काही भीतीदायक अनुभव

2012 मध्ये टिंडरच्या रूपाने भारतात डेटिंग अ‍ॅप्सची सुरुवात करण्यात आली होती, त्या वेळी डेटिंग अ‍ॅप्स प्रत्येकाला वापरता यावे आणि सगळ्यांना डेटिंग करता यावे, अशी त्यांची रचना करण्यात आलेली होती. मात्र आज दहा वर्षांनंतर डेटिंग अ‍ॅप्स वापरताना लोक अधिक काळजीपूर्वक आणि योजनाबद्ध वापर करीत असल्याचे लक्षात आले आहे. अमेरिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ProPublica आणि ColumbiaJournalism Investigations च्या 2019 च्या अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या 12,00 पैकी एकतृतीयांश महिलांचा असा विश्वास होता की अ‍ॅपवर भेटलेल्या त्यांच्या जोडीदाराने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. यातील अर्ध्याहून अधिक महिलांनी आपल्यावर बलात्कार झाल्याची कबुली दिली होती.

हिंज (Hinge), टिंडर (Tinder), बम्बल (Bumble) आणि आयल (Isle) वर सक्रिय असलेल्या अनेक महिलांनी माध्यमांना त्यांच्या छळ, पाठलाग, हल्ला आणि अगदी बलात्काराच्या अनुभवांबद्दल सांगितले. मुंबईतील एका चित्रपट निर्मात्याची आठवण करून देताना ती म्हणते की, मी 2019 मध्ये जवळपास तीन महिने एका जाहिरात निर्मात्यासोबत होते आणि आम्ही जुलैमध्ये वेगळे झालो. त्यानंतर मी त्याच्याबद्दल सगळं काही विसरून गेले आणि आणखीन एका माणसाला डेट करू लागले. ती पुढे सांगते की, ख्रिसमसच्या दिवशी तो माणूस पुन्हा माझ्या घराजवळ आला आणि वरच्या मजल्यावर येण्याचा आग्रह धरला. रात्रीचे 11.30 वाजले होते आणि मी त्याला थोडे लवकर निघायला सांगितले. पण तो दारू पिऊ लागला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करीत त्याने आईला माझ्याबाबत सांगितले असल्याचे सांगू लागला.

कोलकात्यातील एका महिलेला आयला नावाच्या अ‍ॅपवर ती एका स्त्रीलंपट माणसाला भेटल्याचे स्पष्टपणे आठवते. तिने त्या कंपनीच्या अधिकार्‍यांकडे त्याची तक्रारही केलेली होती. हे 2018 मध्ये घडले. त्यावेळी आयला अगदी नवीन होते. स्नेहा नावाच्या प्रतिनिधीने माझ्याशी संपर्क साधला. त्याने मला माझी लव्हस्टोरी त्याच्यासोबत शेअर करायला सांगितली. त्या व्यक्तीची सर्व माहिती मी त्याच प्रतिनिधीला दिली होती. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तो व्यक्ती एक सेनाधिकारी असल्याचा दावा तिने केला आहे.

सगळ्याच तक्रारींची दखल घेतली जात नाही असे नाही

नवी दिल्लीत राहणार्‍या एका लेखिकेने सांगितले की, मी हिंजवर एका व्यक्तीला भेटले. त्याने माझ्यावर बलात्कार केला. मी लगेच अ‍ॅपवर त्याची तक्रार केली. तर हिंजने त्याची दखल घेऊन मला लगेच उत्तर दिले. तिला सांगण्यात आले की त्यांनी त्या व्यक्तीचे प्रोफाइल ब्लॉक केले आहे आणि कायदेशीर मदतदेखील देण्याचे आश्वासन मला व्यवस्थापनाकडून देण्यात आले. हा खूप दिलासा देणारा अनुभव होता. या लेखिकेने माध्यमांना हिंजला केलेल्या ईमेलचे स्क्रीनशॉट्स दाखवले. बलात्काराच्या तक्रारीनंतर काही मिनिटांतच हिंजने त्यांना रिप्लाय केला होता. 6 जून 2022 ला लेखिकेने ही तक्रार केली होती. तुम्ही या घटनेची पोलिसांत तक्रार केल्यास आम्ही कोणत्याही तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत, असे हिंजच्या प्रतिनिधीने त्यांना सांगितले होते. अल्फोन्सो असे या प्रतिनिधींचे नाव होते.

पण अशा गुन्हेगारांना दुसर्‍या अ‍ॅपवरून प्रतिबंधित करण्याचा कोणताही नियम अस्तित्वात नाही. 2022 मध्ये लैंगिक छळ आणि गुन्ह्याच्या किती घटना घडल्या आणि त्यांनी काय कारवाई केली, हे जाणून घेण्यासाठी ढहश झीळपींने टिंडर, हिंज आणि बम्बल यांच्याशी संपर्क साधला. टिंडरचा असा दावा आहे की अशा अहवालांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडे एक समर्पित टीम आहे आणि ती टीम कायद्याच्या अंमलबजावणीसह जवळून काम करते. बम्बलने सांगितले की वालकरच्या झालेल्या हत्येने ते व्यथित झाले आहेत आणि त्यांनी वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या यंत्रणांना अद्ययावत करण्यात आले आहे. परंतु टिंडर किंवा बम्बल या दोघांनीही त्यांना या वर्षी आलेल्या तक्रारींची संख्या किंवा त्यांनी काळ्या यादीत टाकलेल्या खात्यांचा डेटा शेअर केला नाही. तर हिंजने याबाबतीत अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली आहे.

दिल्ली पोलिसांनी डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे 284 गुन्हे दाखल केले आहेत. 2020 पासून बलात्कार/हल्ला/बलात्काराच्या प्रयत्नाचे फक्त पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

अ‍ॅपवर वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना

खरं म्हणजे ऑनलाइन प्रेमाचा जन्म हा काही डेटिंग अ‍ॅपवर झालेला नाही. बॉलिवूडमध्ये जे प्रेम दाखवलं जातं तसं प्रेम करण्याचा प्रयत्न भारतात इंटरनेटच्या जन्मापासूनच सुरू झाला होता. एकेमकांना संदेश पाठवून लोक बोलण्याचा, प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असत. हो पण डेटिंग अ‍ॅपमुळे तेे अ‍ॅप वापरणार्‍या लोकांना एकमेकांना भेटण्याची, बोलण्याची थेट सुविधा करून दिलेली आहे. पण ही पद्धत समाजातील महिला, समलैंगिक आणि इतर उपेक्षित घटकांच्या शोषणासाठी कारणीभूत ठरत आहे. वापरकर्ते वाढविण्यसाठी भलेही या कंपन्यांनी वेगवेगळी सुरक्षा फीचर्स दिलेली असली तरीही एकदा का तुम्ही चॅटबॉक्सच्या बाहेर गेलात तर या कंपन्यांचे पुढे घडणार्‍या घटनांवर कसलेही नियंत्रण राहत नाही आणि यातूनच असे गुन्हे घडत आहेत.

बम्बल नावाचे एक अ‍ॅप स्वतःला स्त्रीवादी म्हणवते. कारण बोलणी सुरू करायची की नाही हा संपूर्णतः त्या वापरकर्त्या महिलेचा अधिकार असतो. या अ‍ॅपवर प्रत्येक वापरकर्त्याची प्रोफाइल नीट तपासण्यात येते आणि त्यांची खात्री पटल्यानंतरच त्यावर ब्लू टिक देण्यात येते. या अ‍ॅपवर प्रोफाइल पिक्चरमध्ये बंदूक किंवा इतर हत्यार असल्यास असे फोटो वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये अश्लील छायाचित्रांना अस्पष्ट करणारे एक फीचरही देण्यात आलेले आहे. हिंज नावाचे अ‍ॅप एखाद्या महिलेने तक्रार केल्यास लगेच कारवाई करण्याचा दावा करते. त्याची सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे सांगतात, ज्या क्षणी एखाद्याची तक्रार केली जाते, आम्ही खात्री करतो की ते पुन्हा कधीही एकमेकांचे प्रोफाइल पाहू शकणार नाहीत. तुमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तक्रारदाराचे नाव प्रकाशित करीत नाही. फसवणुकीच्या प्रयत्नांमध्येही वापरकर्त्यांना सूचित करण्यासाठीची यंत्रणा त्यांच्याकडे आहे. भारतातील 11 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांसह र्ढीीश्रू-चरवश्रू सारखे विशिष्ट अ‍ॅप्स, सरकारी आयडी वापरून प्रोफाइल व्हेरिफाय करण्याचा पर्याय देतात. डेटिंग अ‍ॅपचे संस्थापक आणि सीईओ स्नेहील खानोर म्हणाले, की प्रत्येकाचे फोटो पडताळले जातात. जर वापरकर्त्याने सरकारी आयडी दिला असेल तर त्यांचे प्रोफाइल अधिक विश्वासार्ह मानले जाते.

खानोर म्हणाले की प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल तयार करणे सोपे नाही आणि मजबूत फिल्टरिंग यंत्रणेमुळे अ‍ॅपचा स्वीकार दर फक्त 42 टक्के आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीने स्वतःबद्दल चुकीची माहिती देण्याची शक्यता कमी केली आहे. रिझोल्यूशन प्रक्रिया काही वेळा अपारदर्शक म्हणून समजली जाऊ शकते आणि डेटिंग साइटवरील ईमेल अनेकदा स्पॅम फोल्डरमध्ये संपतात. प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी, टिंडरने अ‍ॅपमधील अहवाल तपासण्यासाठी सुविधा दिली आहे. त्याचा वापर करून तुम्ही केलेल्या तक्रारींचे काय झाले हे तुम्ही पाहू शकता. स्वतःचे अनुभव सांगण्याचा आत्मविश्वास अशा सुविधा देत असतात. टिंडरची मूळ कंपनी मॅच ग्रुपने ऑनलाइन डेटिंगला अधिक सुरक्षित अनुभव देण्यासाठी 125 दशलक्ष गुंतवल्याचा दावा केला आहे आणि 450 लोकांना रोजगार दिला आहे. ते सर्व विशेषतः ढळपवशी च्या विश्वास आणि सुरक्षा पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रित करीत आहेत.

सर्व सुरक्षितता वैशिष्ट्ये असूनही ऑनलाइन डेटिंग खूप लवकर चुकू शकते. याचे पुरुषांनाही नुकसान होऊ शकते. 2018 मध्ये प्रिया सेठवर टिंडरवर लक्षाधीश म्हणून सूचीबद्ध असलेल्या दुष्यंत शर्माच्या हत्येचा आरोप होता. पण अशी प्रकरणे फार कमी आहेत. हे फारसे घडत नाही. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. झारखंडच्या जामतारा आणि हरियाणाच्या मेवातमध्ये सायबर चोरांद्वारे सामान्यतः वापरल्या जाणार्‍या चोरांपैकी एक सेक्सटॉर्शन, डेटिंग अ‍ॅप्सवरदेखील खूप सामान्य झाले आहे. भारतात 31 दशलक्ष डेटिंग अ‍ॅप वापरकर्ते आहेत. अमेरिकेतील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या अहवालात असे आढळून आले आहे की हिंसक लैंगिक मानसिकता असलेले लोक मानसिक आजाराचा सामना करणार्‍या महिलांना लक्ष्य करण्यासाठी अशा अ‍ॅप्सचा वापर करीत आहेत.

अलीकडे नेटफ्लिक्सवर असणारा एक माहितीपट टिंडर स्विंडलर यामध्ये मुलींना त्यांच्या स्वप्नातील राजकुमार भेटवण्याचा दावा करणारे हे असे अ‍ॅप्स वापरण्याचे धोके सांगितले आहेत. LGBTQIA+ समुदायाच्या सदस्यांना Grindr सारख्या डेटिंग अ‍ॅप्सद्वारे लक्ष्य केले जाते आणि त्यांचा गैरवापर केला जातो.

श्रद्धाच्या हत्येने डेटिंग अ‍ॅप्सबाबत असणार्‍या सगळ्या शंकांना पुन्हा एकदा जागृत केले आहे. एका 25 वर्षीय जाहिरात व्यावसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, मी कधी कधी निष्काळजीपणाने पहिल्या किंवा दुसर्‍या भेटीतही लोकांना माझ्या घरी बोलावते. कारण बाहेर जाणे खूप महाग झाले आहे. ती पुढे म्हणाली, पण सध्या मी हिंज, बम्बल किंवा इतर कोणत्याही डेटिंग अ‍ॅपवर परत येण्यापेक्षा दीर्घ ब्रेक घेईन.

Tags: अटकडेटिंग अ‍ॅपनिर्माणपोलिसबम्बलभारतातभीतीमहिलामाहितीलिव्ह इन पार्टनरश्रद्धा वालकरस्वाइप
Previous Post

लोकशाहीचे रक्षण

Next Post

ट्विटरवरील निलंबित खाती सुरू होणार

Next Post
खाती

ट्विटरवरील निलंबित खाती सुरू होणार

No Result
View All Result

Recent Posts

  • बालगणित शिक्षण
  • देवदासींना दिलासा
  • रिक्षा मीटर रिकॅलिबे्रशनची मुदत वाढवून विलंब दंड रद्द करणार
  • पालिकेच्या ‘भंगाराला’ खरेदीदार मिळेना!
  • पालिका कार्यालयात सुविधांची बोंब

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist