वृत्तसंस्था
अहमदाबाद|
विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. तेथे तो खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसले. यावेळी त्यांनी शमीला मिठीही मारली. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी या भेटीचा फोटो शेअर केला आहे.
अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले होते. सामन्याच्या दुसर्या डावात ते स्टेडियमवर पोहोचले.
मोदींनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्यासमवेत पॅट कमिन्स यांच्याकडे २०२३ च्या विश्वचषकाची ट्रॉफी सुपूर्द केली. जडेजाने मोदींसोबतचा एक फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मआमची टूर्नामेंट खूप चांगली होती पण काल आम्ही हरलो. आपण सर्व दु:खी आहोत पण लोकांचा पाठिंबा आपल्याला पुढे नेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल ड्रेसिंग रुमची भेट विशेष आणि खूप प्रेरणादायी होती.
ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला
विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा ६ गडी राखून पराभव झाला आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या पराभवाने भारतीय चाहत्यांना २००३ च्या विश्वचषक फायनलची आठवण करून दिली. २० वर्षांपूर्वी जोहान्सबर्गमध्ये कांगारूंनी आमचा १२५ धावांनी पराभव केला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणार्या टीम इंडियाचा डाव २४० धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी ४३ षटकांत ४ गडी गमावून २४१ धावांचे लक्ष्य गाठले.