दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
मार्शल आर्ट ही कला माणसाला समाजामध्ये ताठ मानेने उभे राहायला शिकवत असून, जीवनात येणार्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला तयार करीत असते, असा मौलिक सल्ला प्रशिक्षक याकूब यांनी राहनाळ शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.
जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे नुकताच प्रशिक्षक याकूब व त्यांच्या १६ विद्यार्थांनी मार्शल आर्टची प्रात्यक्षिक सादर केली. या कार्यक्रमाला राहनाळ गावातील समाजसेवक दीपक भोईर, भालचंद्र पाटील, अॅडव्होकेट परेश म्हात्रे, अंजना पाटील, मनाली जाधव, त्याचबरोबर पालक वर्ग आणि आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस मित्र भिवंडी संघटना अध्यक्ष संगीता अंकुश पाटील यांच्या माध्यमातून मार्शल आर्ट प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले तर आभार प्रदर्शन अंकुश ठाकरे यांनी केले