दिनमान प्रतिनिधी
नवी मुंबई।
कांदळवन संरक्षण विभागाने ऐरोली खाडीलगत खारफुटी आणि सागरी जैवविविधतेविषयी माहिती देणारे किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र उभारले आहे. या केंद्रात माहिती देणारी दोन मोठी दालने असून सध्या दिवाळी सुट्टीत विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. दोन महिन्यांत या केंद्राला अडीच हजार पर्यटकांनी भेट दिली असून कांदळवन विभागाला दीड लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
कांदळवन कक्षात प्राणी, पक्षी, कांदळवन याविषयी माहिती मिळत असून विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यास केंद्र ठरत आहे. विविध मासे, प्राणी यांची माहिती, भरती-आहोटीसंदर्भात प्रदर्शन चित्र यातून ही माहिती उलगडत जाते. व्हिडीओद्वारे कांदळवनाबद्दल माहिती देण्यात येते.