दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रविवार, ११ जून रोजी सावरकरनगरमधील आर. जे. ठाकूर कॉलेज येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी दिली. या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या वेळी उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नोकरीच्या संधी
या रोजगार मेळाव्यामध्ये ओएसए एचआर सोल्यूशन, डिझाविव्ह स्किल, युनिक हेलथ केअर, एसएबीआर रिक्रुटमेंन्ट, वी५ ग्लोबल सव्हिर्स प्रा.लि., बजाज अलियान्झ, पेटीएम प्रा.लि, कॅम्पक्स ग्रुप, क्युस कॅप, आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस, स्पॉटलाईट कन्सल्टेशन, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, वन पॉईंट वन आदी विविध नामांकित कंपन्या मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या वेळी एकूण २,५३५ विविध पदे उपलब्ध असणार आहेत.