दिनमान प्रतिनिधी
ठाणे| चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसिआ) या लघुत्तम, लघू मध्यम औद्योगिक संघटनांच्या अखिल भारतीय शिखर संस्थेच्या २०२१ ते २०२३ या दोन वर्षांकरिता नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी संदीप जयंतीलाल पारीख यांची निवड करण्यात आली. तर भारतीय स्तरावर लघुउद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. एम. आर. उर्फ आप्पासाहेब खांबेटे यांची अध्यक्ष एमेरिटस म्हणून निवड करण्यात आली. तसेच पुरुषोत्तम आगवन उपाध्यक्ष, धर्मू ए. वंजानी उपाध्यक्ष, मुकेश उत्तमनी, उपाध्यक्ष निनाद आर. जयवंत महासचिव, निपुण जे. मेहता सहसचिव गुजरात, चेतन वैशंपायन खजिनदार
आदी उद्योजकांची कार्यकारी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच देवेन सोनी, विजय जोशी गुजरात, सुनील कुलकर्णी
सुजाता सोपारकर, उमेश तायडे, विवेकराज बाजपेयी ओडिसा, अनुराग अग्रवाल मध्य प्रदेश, मनोज पाटील, आशीष सिरसाट, भावेश मारू हुजैफा बांबोट, जुल्फेश शहा आदींची निवड करण्यात आली.