दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर|
जिममध्ये जाणार्या तरुणांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या एका २० वर्षीय तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले. उल्हासनगर कॅम्प तीन येथील शांतीनगर परिसरात सेंट्रल पार्क हॉटेलजवळ महाबली जिम आहे. बुधवारी रात्री ११च्या सुमारास जिममधून बाहेर पडलेले चार तरुण जिमच्या बाहेर आले होते. हे तरुण एका तरुणाला बेदम मारहाण करत होते. हा प्रकार घटनास्थळापासून काही
अंतरावर उभ्या असलेल्या अविनाश परशुराम ठाणगळे (२०) यांनी बघितला. तडकाफडकी त्या ठिकाणी गेला तेव्हा त्याच्या शेजारी राहणारा व मित्र शहा अलम शेख याला आरोपी तरुण मारहाण करीत असल्याचे दिसले. यानंतर अविनाशने भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करून शेखला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र यामुळे मारहाण करणारे तरुण आणखीनच संतापले आणि आरोपींपैकी एकाने अविनाशच्या छातीवर चाकूने वार केले.