दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
आनंद दिघे यांची सणसणीत कानाखाली खाल्लेले जितेंद्र आव्हाड आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच आव्हाड यांनी शरद पवार यांच्यामुळे आनंद दिघेंची जेलमधून सुटका झाली, असे विधान केल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केला. डोंबिवली शिवसेना शहर शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड यांनी एका सभेमध्ये बोलताना शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांची टाडातून सुटका झाली असे विधान केले होते. याबाबत बोलताना शिवसेना पदाधिकार्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शिल्लक सेना असा उल्लेख करीत धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तुम्ही सोडली. धर्माचं राजकारण करतात अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून राजकारण करता, कुठे तरी लाज बाळगली पाहिजे. तुुम्ही जाहीर निषेध करा, असे आव्हानही उद्धव ठाकरे गटाला या वेळी केले. आव्हाडांनी पुन्हा असं वक्तव्य केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला.