वृत्तसंस्था
नवी दिल्ली।
निरोगी राहण्यासाठी व्यायामाबरोबर चांगली झोपही महत्त्वाची आहे. तरीही अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागते. यामुळे झोपेच्या निर्धारित कालावधीत 7 ते 9 तासांऐवजी आपण केवळ पाच किंवा सहा तास झोपू शकतो. कधी कधी रात्रभर जागे राहावे लागते. रात्रीची ही अपूर्ण झोप पुढचा संपूर्ण दिवस खराब करू शकते. त्याचा विचारप्रक्रियेवरही परिणाम होतो. याशिवाय रक्तदाब आणि हृदयगती वाढू शकते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डुलकी (पॉवर नॅप) हा एक चांगला उपाय आहे. यातून आपल्या बौद्धिक प्रक्रियांमध्ये कामगिरी सुधारू शकते. झोपण्याची मर्यादा 30 मिनिटांपर्यंत हवी. आपल्यालाही ही हलकीशी झोपही विश्रांती देते व आपण अधिक चांगले काम करू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, रात्रभर झोप न लागल्यानंतरही ज्यांनी व्यायाम केला ते त्यांनी निष्क्रिय लोकांपेक्षा चांगले काम केले. पेन स्टेट युनिव्हर्सिटीमधील फॅमिली स्टडीजच्या प्राध्यापिका सुमी ली सांगतात की, दुपारी काही वेळ फिरून आपल्याला हलकेपणा आणि व्यायाम दोन्हीचे फायदे मिळू शकतात. प्रकाशामुळे पुढच्या रात्री झोप सुधारण्यास मदत होते. थंड पाण्याने आंघोळ घेणे, हलके संगीत ऐकणेही आरोग्यासाठी चांगले ठरेल.
जर आपल्याला रात्रीची झोप भरून काढायची असेल तर दुसर्या दिवशी पौष्टिक व हलके अन्न वेळेवर खाणे फायदेशीर ठरते. पुन्हा भूक लागल्यास हलका नाश्ता करा. टोस्ट किंवा दही खाऊ शकतो. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास जेणेकरून तहान लागल्याने आपली रात्रीची झोप उडणार नाही.