सूरज सामंत | अर्थभान
मध्यंतरी इंडियन एस्प्रेसचा रिपोर्ट आला होता. एलारा कॅपिटल फंड ही अदानी उद्योगात गुंतवणूक करणारी कंपनी. डिफेन्स फर्ममध्ये अल्फा डिजाइन टेनॉलॉजी नावाची कंपनी अदानी यांची भागीदार कंपनी. ही फर्म इजरो आणि डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची कंत्राट घेते. या फर्मचं ५९० कोटींचं सुरक्षा मंत्रालयाबरोबर कॉन्ट्रॅट आहे. अदानी डिफेन्सकडे २६% भागीदारी व व्यवस्थापकीय अधिकार आहेत.
भारतामधील भांडवलशाही अर्थव्यवस्था समजून घेत असताना या लेखमालेमध्ये आपण गौतम अदानी यांच्या व्यवसाय विस्ताराकडे उदाहरण म्हणून बघितले. मागच्या भागात सरकारी धोरणे व नियम यांचा आर्थिक प्रगतीमध्ये मोठा सहभाग होता हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर सुरू असलेल्या गदारोळादरम्यान सुप्रीम कोर्टाने सेबीला निर्देश दिला की सियुरिटीज कॉन्ट्रॅट्स रेगुलेशन्स रुल्स नियम १९(अ)चे उल्लंघन झाले आहे का हे तपासावे. १९ (अ) म्हणजे पब्लिक लिस्टेड कंपनीमध्ये प्रमोटर्स ७५% हून अधिक शेअर्स आपल्याकडे (नातेवाइकांसकट) असू नयेत. कारण २५% शेअर्स लोकांकडे असावे व त्यांना योग्य भाव मिळावा. तसे नसणे म्हणजे एका प्रकारे घोटाळासुद्धा म्हणता येईल. हिंडेनबर्गनेदेखील हाच आरोप केला होता. अदानी उद्योगाने परदेशातील शेल कंपन्यांमध्ये आपलेच पैसे ओतून शेअरच्या किमती वाढवून त्यावर भरमसाठ कर्ज घेतले गेले असे म्हणणे होते.
ऑर्गनाइज्ड क्राइम्स अँड करप्शन रिपोर्ट प्रोजेट या आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारिता करणार्या संघटनेचा तपास व फायनान्शिअल टाइम्सच्या या विषयावरील बातम्या काही माहिती उघड करतात. १३ संशयास्पद वाटणार्या कंपन्यांबाबत सेबी २०२० मध्ये चौकशी करीत होती. त्यातील दोन संस्थांचा थांगपत्ता लागत नव्हता. ओसीएसएआरपीने शोधलेल्या या दोन कंपन्या मॉरिशसमधील इन्व्हेस्टमेंट फंड्स युनिट्स आहेत. (ईआयएफएफ) इमर्जिंग इंडिया फोकस फंड आणि ईएमआरएफ रिसर्जन्ट फंड. या दोन फंडमध्ये सर्वाधिक पैसे गुंतवणार्या परदेशी व्यक्ती आहेत चांग चुंग लिंग आणि नासिर अली शाबान अहली. हिंडेनबर्गच्या पेपर्समध्ये चार वेळा त्याचा उल्लेख आला, परंतु अदानी उद्योगाकडून दिल्या गेलेल्या उत्तरात मात्र नाव टाळले गेले. खुलाशानुसार गुंतवणूक बर्मुडामधील एका फंडमधून फिरवून आणली जात होती. मार्च २०१७ पर्यंत दोघांची गुंतवणूक ४३० मिलियन डॉलर्स इतकी झाली होती. युनायटेड अरबमध्ये एसएल इन्व्हेस्टमेंट अँड अॅडवायजरी सर्व्हिसचे मालक विनोद अदानी. गौतम अदानी यांचे बंधू यांनी सल्लागार म्हणून दोन्ही फंड्स कडून १.४ मिलियन डॉलर्स फी घेतली. ओसीएसएआरपी नुसार जानेवारी २०१७ मध्ये अदानी इंटरप्रायजेसच्या प्रमोटर्स ग्रुपकडे ७४.९% शेअर्स होते याचा अर्थ पब्लिककडे अंदाजे २५.१% शेअर्स होते. त्यापैकी नासिर अली आणि चांग चुंग लिंगकडे १३.५% शेअर्स होते. म्हणजे एका अर्थी ८८% शेअर्स अदानी प्रमोटर्सकडेच होते. हाच प्रकार अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन आणि इंटरप्रायजेसमध्ये दिसून आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हिंडेनबर्गच्या खुलाशानुसार चँग चुंग लिंग गुदामी इंटरनॅशनल वर डायरेटरपदी होता. २००२च्या कंपनी फायलिंगनुसार या कंपनीचा संबंध अदानी इंटरप्रायजेसबरोबर होता. २०१८ मध्ये गुदामीचं नाव भारतीय बातम्यांमध्ये आले सिंगापूरच्या ३ कंपन्यांपैकी एक म्हणून, ज्यांचा ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर स्कॅममध्ये सहभाग असल्याचा संशय होता. गुदामी इंटरनॅशनलने माँटेरोसा इन्व्हेस्टमेंट होल्डिंगच्या बर्याच फंड्समध्ये गुंतवणूक केली आहे. माँटेरोसाची एकत्रितरीत्या अदानी समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये ४.५ बिलियन डॉलर्सची मालकी असल्याचे म्हटले आहे. हिंडेनबर्गच्या मते, डिरेटरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या काही निर्णयांनुसार दिसते की चँग चुंग लिंग हा चिनी नागरिक अदानीच्या विविध कंपन्यांमध्ये डायरेटर पदावर होता. रेकॉर्ड्स त्याचा दिलेला पत्ता हा विनोद अदानी यांचा पत्ता होता. पुन्हा हिंडेनबर्ग म्हणते, ग्रोमोर ट्रेड जेव्हा २०११ मध्ये अदानी पॉवरबरोबर विलयीकृत झाली आणि ४२३ मिलियन डॉलर्सचा नफा झाला, त्या ग्रोमोरमध्ये चँगचा मोठा हातभार होता. ८८ पैकी शेवटच्या ३ प्रश्नांत पीएमसी प्रोजेट्स या खासगी कंपनीसंबंधी शॉर्टसेलिंगसंदर्भात उल्लेख आहे. त्याची मालकी चँग चुंग लिंगच्या मुलाकडे आहे. आणि तैवान मीडियाने त्याचा तैवानमध्ये सरकारी कार्यक्रमात अदानी बॅनर हातात घेऊन अदानी उद्योगाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा फोटो आला होता.
प्रसारमाध्यमांच्या खुलाशानंतर एक अंधुक नेटवर्क व दुवे उजेडात आले आहेत, ज्यात कथितपणे राउंड-ट्रिपिंग, मनी लाँड्रिंग आणि सेबी कायद्यांचे उल्लंघन दिसते. चांग आणि अहली हे मध्यस्थ म्हणून ओळखले गेले आहेत, ज्यांनी इंडोनेशियातून भारतात कोळसा आयात करीत असताना किमती वाढवून सुमारे १२,००० कोटी रुपये उकळल्याचे म्हटले जाते. अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम फर्म आहेत, ज्यांना अदानीकडून मोठ्या प्रमाणात बांधकाम कंत्राटे मिळाली आहेत. मॉर्निंग कॉन्टेसटने होवे इंजिनीअरिंग प्रोजेटस यांचा अदानी समूहाशी संबंध जोडणारे पुरावे दाखवले आहेत. मॉरिशसपर्यंत विस्तारलेली एक रचना हॉवे यांना विनोद अदानी आणि चांग चुंग लिंग यांचा मुलगा चँग चिएन टिंग यांना जोडते. हॉवेने अहमदाबादमधील अदानी समूहाच्या परिसरातून काम केले आहे आणि २००८ पासून त्यांचे संचालक होते. संलग्न कंपन्यांच्या वेबसाइट्स आणि कर्मचार्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल होवे आणि अदानी यांच्यातील संबंध अतिरिक्त पुरावे देतात. खरंतर होवे आणि पीएमसी प्रकल्पांची समान मालकी आहे, हे सूचित करते की अदानी पोर्ट्स व सेझचे बरेचसे बांधकाम संबंधित पक्षांकडून केले जात आहे.
मध्यंतरी इंडियन एस्प्रेसचा रिपोर्ट आला होता. एलारा कॅपिटल फंड ही अदानी उद्योगात गुंतवणूक करणारी कंपनी. डिफेन्स फर्ममध्ये अल्फा डिजाइन टेनॉलॉजी नावाची कंपनी अदानी यांची भागीदार कंपनी. ही फर्म इजरो आणि डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ची कंत्राट घेते. या फर्मचं ५९० कोटींचे सुरक्षा मंत्रालयाबरोबर कॉन्ट्रॅट आहेत. अदानी डिफेन्सकडे २६% भागीदारी व व्यवस्थापकीय अधिकार आहेत. एलारा व अदानी मिळून ५१% म्हणजे मेजॉरिटी भागीदारी आहे. एलारा मॉरिशसमध्ये रजिस्टर्ड आहे आणि अदानी यांच्या कंपनीत ९,००० कोटींपेक्षा गुंतवणूक आहे. एलाराच्या गैरव्यवहारांची चौकशी सुरू आहे. मिग २१ संबंधित कामाचे कॉन्ट्रॅट या कंपनीकडे आहे. सैन्यासाठी रडार वगैरे बनवण्याचे कामसुद्धा आहे आणि आता यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हिंडेनबर्ग रिपोर्ट येण्याच्या काही दिवस आधी १६ जानेवारीला साब या स्वीडिश कंपनीने फायटर विमाने बनवण्याचा २०१७ मध्ये अदानी उद्योगासोबत केलेला करार तोडला. अदानी कंपनीने हिंडेनबर्ग रिपोर्टवर टीका केली आणि कोर्टात खेचण्याची धमकी दिली. हिंडेनबर्गने म्हटले की अमेरिकन कोर्टात जरूर या; आम्ही अजून प्रश्न विचारू आणि कागदपत्रे मागू. मूळच्या भारतीय पण ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेतलेल्या अदानी कंपनीच्या सीएफओने भारतीय झेंड्याच्या बाजूला उभे राहून ‘हा भारतावर हल्ला आहे’ असे म्हटले. हिंडेनबर्गने उत्तर दिले की राष्ट्रभक्तीच्या आडून घोटाळा करणे हा एकप्रकारे राष्ट्रद्रोह. या गदारोळात अदानी उद्योगाने एफपीओ आणला. रिटेल इन्वेस्टर्स, कंपनी स्टाफने पाठ फिरवूनदेखील तो पूर्ण सबस्क्राइब झाला. त्यात गुंतवणूक करणारी अबुधाबीमधील कंपनी असल्याचे समोर आले. भारतातील काही संस्थांनी बाजारात अतिशय कमी किमतीत उपलब्ध असलेले शेअर्स चढ्या दराने का घेतले, हे प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर एफपीओ मागे घेऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत देणार, अशी घोषणा करण्यात आली. दरम्यान, एलआयसीने पहिल्यांदाच तोटा बघितला.परंतु हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे काही भारतीयांना निश्चितपणे फायदा झाला. हिमाचल प्रदेशमधले अदानी उद्योगाचे दोन सिमेंट प्लांट, गागल आणि दरलाघाट परवडत नाही म्हणून बंद करण्याचा निर्णय अदानी व्यवस्थापनाने डिसेंबर २०२२ मध्ये घेतला होता. अदानी व्यवस्थापनाची अपेक्षा होती की मालवाहतूक करणार्यांनी १०.५८ रुपये प्रति किलोमीटर प्रति टन हा दर ६ रुपये करावा. या व्यवसायावर ७,००० ट्रस उपजीविकेसाठी अवलंबून होते म्हणजे मालक, ड्रायव्हर व इतर व्यक्तीसुद्धा आल्या. तीनेक आठवडे झाले पण व्यवस्थापनाकडून वाटाघाटीसाठी काही हालचाल होत नव्हती. ट्रक ड्रायव्हरनी रॅली काढल्या, प्रदर्शने केली पण कंपनी दाद देत नव्हती. जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिपोर्ट आला आणि काही दिवसांनी अदानी व्यवस्थापनाने जाहीर केले की त्यांनी याच्यावर सौहार्दपूर्ण मार्ग काढला. ९.३० रुपये प्रति किलोमीटर प्रति टन अशा किमतीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. हिंडेनबर्ग रिपोर्टचा फायदा वाहतूक व्यावसायिक, त्यांच्यावर अवलंबून कामगार व कुटुंबांना झाला. हा रिपोर्ट आला नसता तर…? कदाचित सर्व हातखंडे वापरून हा सौदा पाहिजे त्या किमतीवर पूर्ण केला असता. अदानी यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा आढावा पुढील भागात घेऊ.
क्रमशः
(लेखक, व्यवसायांना स्ट्रॅटेजीबाबत सल्ला देतात.thewisecompassgmail.com)