दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर|
उल्हासनगर शहरात खुलेआम जुगार-मटका, अंमली पदार्थ, गावठी दारूचे धंदे सुरू असून शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पोलिस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. यामुळे उल्हासनगर भाजपाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शेखचा जुगार-मटक्याचा धंदा होता. या जुगार मटक्याच्या धंद्यातीत पैशाच्या व्यवहारातून पाच जणांच्या टोळीने त्याची हत्या केली. एक महिन्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जुगार मटक्याच्या अड्ड्यामध्ये घुसून तोडफोड केली होती. त्या वेळी पोलिसांनी तोडफोड करणार्या महिला कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.