दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
भाजपा वाहतूक संघटनेचे सदस्य नितीन थोरात यांना 22 मार्च रोजी यांना कल्याण कोर्ट गेटसमोर जमिनीवर पडलेला आयफोन कंपनीचा मोबाइल मॉडेल क्रमांक 11 हा सापडला होता. त्यांनी ताबडतोब भाजपा वाहतूक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक मल्हारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विल्सन काळपुंड यांच्याशी संपर्क साधला. मोबाइलची बॅटरी उतरल्याकारणाने मोबाइल बंद होता. तो मोबाइल चालू केल्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून आज महात्मा फुले पोलिस स्टेशन येथील एपीआय योगेश पाटील यांच्या समक्ष आंबिवली येथील वडवली गावचे रहिवासी कृष्णकुमार गौतम यांचा महागडा मोबाईल गहाळ झाला होता. तो त्यांना संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विल्सन काळपुंड यांच्या हस्ते परत करण्यात आला. या वेळी भाजपा वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विल्सन काळपुंड, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य विजय मोरे तसेच संघटनेचे सदस्य ज्यांना मोबाइल भेटला तेथे नितीन थोरात उपस्थित होते.