Site icon महाराष्ट्र दिनमान

अतिवृष्टीचा अलर्ट

अतिवृष्टीचा अलर्ट

दिनमान प्रतिनिधी
ठाणे| मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात९ ते १२ जून या चार दिवसांत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने ठाणे महापालिकेची यंत्रणा अलर्ट झाली आहे. सर्व अधिकार्‍यांनी सतर्क राहण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.

शहरात ज्या ठिकाणी पाणी तुंबण्याची शयता आहे. त्या ठिकाणी भेट देवून आवश्यक ती कार्यवाही करणे, पाणी तुंबणार्‍या ठिकाणी सबमर्शीबल पंप बसविणे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे बोटींची व्यवस्था करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्या. अतिवृष्टीत प्रभाग समिती स्तरीय अधिकार्‍यांनी स्थानिक नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी सर्व अधिकार्‍यांना दिल्या.

Exit mobile version