• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home मनोरंजन

भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल!

‘धर्मवीर मु. पो. ठाणे’तील गाण्याने अश्रूंचा बांध फुटला

प्रतिनीधी by प्रतिनीधी
April 26, 2022
in मनोरंजन
0
भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल!
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनमान प्रतिनिधी
ठाणे। आपल्या महाराष्ट्राला गुरू आणि शिष्य परंपरेचा इतिहास आहे. सामाजिक-राजकीय क्षेत्रातही नेतेपदापर्यंत गेलेल्या प्रत्येकाने कुणाचे तरी शिष्यत्व पत्करले आहे. गुरूने दाखविलेल्या विचारांच्या वाटेवर शिष्याने यशस्वी प्रवास केला आहे. राजकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याची आदर्शवत ठरावी अशीच एक जोडी या महाराष्ट्राने पाहिली आहे. ही जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे.

त्यांच्या आयुष्यात जे स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचे होते, जी भक्ती दुर्गामतेसाठी होती अगदी तशीच श्रद्धा बाळासाहेबांवर होती. त्यांच्या याच गुरुभक्तीचं दर्शन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातही होणार आहे. तेच गुरुशिष्याचं नातं कथन करणारं गुरुपौर्णिमा हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी तस्वीर, पुढ्यात खुर्चीवर बसलेले बाळासाहेब आणि त्यांच्या चरणी बसलेले आनंद दिघे आणि हा सर्व नजरा आपल्या भरल्या डोळ्यांत साठवणारे एकनाथ शिंदे असे सहजसुंदर दृश्य या गाण्यातून रेखाटण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे, असे आनंद दिघे मानायचे. या दिवशी गुरूची सेवा केल्यास पदरात पुण्य पडते, अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या गुरूंचे चरणकमल धुण्याचा व पाद्यपूजा करण्याचा प्रसंग या गाण्यातून रेखाटण्यात आला आहे. आनंद दिघे यांची जी श्रद्धा बाळासाहेबांप्रति होती अगदी तशीच श्रद्धा आनंद दिघेंबद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या या गुरू- शिष्य नात्याची अनोखी गोष्ट या चित्रपटातून आणि या गाण्यातून उलगडणार आहे. संगीता बर्वे यांचे शब्द असलेल्या या गाण्याला संगीत आहे अविनाश-विश्वजीत यांचे, तर ते गायले आहे मनीष राजगिरे यांनी. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे. या गाण्यातून प्रथमच बाळासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तीरेखेची झलक दिसते आहे. प्रसाद ओक, क्षितिश दाते यांच्याप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारणार्‍या मकरंद पाध्ये यांच्या लुकवरही रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी घेतलेली मेहनत दिसून येते.

धर्मवीर आनंद दिघे यांनी निःस्वार्थीपणे, कोणताही लोभ न ठेवता केवळ आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचले. यातून आनंद दिघे यांचा करारी बाणा तर दिसणारच आहे, पण त्यांच्या आत असलेला एक हळवा शिष्य, गुरूंपुढे आदराने नतमस्तक होणारा शिष्य, अशी त्यांची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना गुरुपौर्णिमा या गाण्यातून बघायला मिळते आहे.

Tags: आनंद दिघेकव्हरस्टोरीगुरुपौर्णिमाधर्मवीरबाळासाहेब ठाकरेमुक्काम पोस्ट ठाणेशिवसेना
Previous Post

शहर विद्रूप करणार्‍या पोस्टरबाजांवर फौजदारी

Next Post

समर्थ भारतच्या ‘पुनर्निर्माण’चा युनिसेफकडून गौरव

Next Post
समर्थ भारतच्या ‘पुनर्निर्माण’चा युनिसेफकडून गौरव

समर्थ भारतच्या ‘पुनर्निर्माण’चा युनिसेफकडून गौरव

No Result
View All Result

Recent Posts

  • मुलांचं शिकणं म्हणजे नेमकं काय?
  • परदेशी परदेशी
  • रिजन्सी अनंतम्मधील बायो गॅस प्रकल्पाचे उद्घाटन
  • पांढरा बिब्बा; चमत्काराला नमस्कार नको!
  • रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist