दिनमान प्रतिनिधी
कल्याण|
अन्न व औषध प्रशासन, ठाणे व बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगे मिलेट मेला व मिलेट वॉकथॉनचे आयोजन शुक्रवारी केले होते. विद्यार्थ्यांनी भरडधान्यापासून वेगवेगळ्या ८८ डिश तयार केल्या. विद्यार्थ्यांना भरडधान्य जसे की ज्वारी, बाजरी, नाचणी, कोद्रा, भगर इत्यादीचे दैनंदिन जीवनातील आहारातील महत्त्व याबाबत डाएटिशियन डॉ. शीतल नांगरे, प्रोजेक्ट ऑफिसर कन्झ्युमर प्रोटेक्शन गजानन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी साहाय्यक आयुक्त (अन्न) व्यंकटराव चव्हाण, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.