दिनमान प्रतिनिधी
डोंबिवली।
स्ट्रोक शिकवल्यावर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत मुंबई येथे प्रथम भाग घेऊन उत्तम कामगिरी करणार्या गीतिशा प्रवीण भंडारे या 9 वर्षीय विद्यार्थिनीला समुद्राची आवड निर्माण झाली. एवढ्यावरच न थांबता गीतिशाने लहान वयात समुद्रातील इव्हेंट करायचा संकल्प सोडला.
18 नोव्हेंबरला एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया 12 किलोमीटर पोहण्यासाठी सराव सुरू केला. गीतिशा दररोज यश जिमखानामध्ये 3 ते 4 तास प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होती. यश जिमखाना मालक राजू वडनेरकर व जिमखाना स्टाफचे मार्गदर्शन मिळाले. गीतिशाने महिन्यातून दोन वेळा उरणला संतोष पाटील यांच्याकडे समुद्रात सराव केला. शनिवार, 18 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजून 8 मिनिटांनी अंगाला ग्रीस लावून समुद्राची पूजा करून अथांग अरबी समुद्रात तिने उडी मारली. मध्येच गार वारा सुटलेला, मोठमोठ्या जहाजांची ये-जा सुरू होती. त्याच्यामुळे लाटांमुळे तोंडात घाण व खारट पाणी जायचे.
गीतिशा गेट वे ऑफ इंडिया येथे पोहचल्यावर प्रशिक्षक विलास माने, संतोष, आखाडे व उपस्थितांनी तिचे जोरदार स्वागत केले. गीतिशा प्रवीण भंडारे ही डोंबिवलीत राहत असून, रॉयल इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे.