दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
आर्थिक सुबत्तेमुळे अनेक जणांनी घरच्या घरी होणारी चटणी-भाकर किंवा, डाळ-भाजीकडे दुर्लक्ष करून चटकदार, मसालेदार अर्थात एका क्लिकवर ऑनलाइन ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ खाण्याकडे मोर्चा वळवला आहे. नुकतीच केरळमध्ये घडलेली एक घटना यातून बाहेरचे खाणार्यांचे आजारविकार बळावणार, प्रसंगी मृत्यूच्या दारात हे पदार्थ नेऊन सोडतील याची वर्दी देत आहेत.
ऑनलाइन ऑर्डर केलेले जेवण केरळमधील तरुणीच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. तिनेे रेस्टॉरंटमधून ऑनलाइन बिर्याणी ऑर्डर केली, जी खाल्ल्यानंतर तिला विषबाधा झाली. आठवडाभराच्या उपचारानंतर तरुणीचा मृत्यू झाला.
कापलेली फळे आणि भाज्या खरेदी करू नका.
-घराबाहेर मांसाहार कमीत कमी खा
-पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाणे टाळा
-तुम्ही जे काही बनवाल ते स्वतः मुलांसमोर खाऊन एक उदाहरण ठेवा.
-चिप्स, सोडा आणि ज्यूस हे प्रिझर्व्हेटिव्ह्जसह घरी ठेवण्याऐवजी फळे आणि भाज्यांसारखे आरोग्यदायी पर्याय ठेवा
-दिवसातून किमान दोनदा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून भोजन करावे.
घरासाठी रेशन घेणार असाल तर मुलांना सोबत घेऊन जा. स्वयंपाकातही त्यांची मदत घ्या
-खाण्याची वेळ निश्चित करा, विनाकारण भूक लागणार नाही
-जंक फूड फ्रीजमध्ये किंवा किचनमध्ये ठेवू नका
बाहेरचे जेवण खाल्ल्याने काय नुकसान होईल, फूड पॉइझनिंग म्हणजेच अन्न विषबाधा झाल्याचे कसे कळेल व त्यावर काय उपाय आहेत?
अन्नविषबाधेची लक्षणे?
पोटदुखी, अतिसार, उलट्या होणे, मळमळ, ताप, निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन ही लक्षणे दिसू लागल्यावर निष्काळजीपणा करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
विषबाधेमुळे मृत्यू?
अन्न विषबाधा कधी कधी गंभीर अतिसार, जॉन्डिस म्हणजेच कावीळ आणि डिसेंट्री होऊ शकते. त्याच्यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर मृत्यूही होऊ शकतो. लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. लोक बाहेर काहीही खातात आणि त्यांना लूज मोशन्स होतात. अन्न विषबाधेने आतड्यांचा अल्सरही होऊ शकतो. जर अन्नातून विषबाधा झाली असेल तर विशांती घ्या आणि जास्त धावपळ करू नका. भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीरातील पाण्याची पातळी कायम राहते. खिचडी, केळी, दलिया असे हलके अन्न खात राहा. ओआरएस पाणी पीत रहा. तुम्हाला सतत उलट्या होत आहेत. 3-4 दिवसांनंतरही प्रकृतीत सुधारणा होत नाही. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.