डॉ. प्रभाकर आपटे, संजीवनी आपटे | मंदिराच्या परिसरात
आजपर्यंत दर मंगळवारच्या ‘महाराष्ट्र दिनमान’च्या साप्ताहिक विविध या सदरात चिंतनासाठी एखाद्या ग्रंथाचा आधार घेत असू. या वेळी मुक्त चिंतन असाच विषय घेत आहेत. साधारपणे 30 वर्षांपूर्वी एक थाई विद्यार्थी माझ्याकडे संस्कृत सुभाषिते शिकायला येत असे. त्या वेळी संस्कृत-सुभाषित म्हणजे एनर्जी कॅप्सुल्स आहेत असे म्हणत असे. एका सुभाषितातच असं म्हटलं आहे की पृथिव्यां तृणि रत्नानि जलं अन्नं सुभाषितम् । wine has drowned more men than water याचं म्हण साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांनी ‘वरुणापेक्षा वारुणीनीच जास्त माणसं बुडवली आहेत’ असं चपखल भाषांतर केलं. केळकरांचं वर्णन वि. द्या. बुवांनी म्हणे म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही. आराम खुर्चीत बसून शेंगदाणे खाई, असे केले आहे. आचार्य अत्र्यांचा स्वभाव जुन्या पिढीतल्या सर्वांना माहीत आहे. त्यांनी म्हणे त्यांच्या साष्टांग नमस्कार या प्रयोगाला केळकरांना बोलावलं आणि त्या नाटकात एका नर्सची एंट्री आहे. तिचा प्रवेश होताच समोरचा नट ‘या नरसोपंत’ असं स्वागत करतो. आता ही शक्कल आचार्य अत्र्यांखेरीज कोणाच्या मेंदूतून निघणे शक्य नाही.
तर आता आपण सुभाषितं म्हणजे एनर्जी कॅप्सुल या माझ्या स्वकृत वचनाकडे वळू. सुभाषित रसं हढ्व। सुधा भीता दिवं गता। इथे ‘दिवं गता’ याचा शब्द घ्यायचाय. पूर्वी म्हणे अमृतदेखील पृथ्वीवर मिळत असे. दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव । तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् । या ठिकाणी सुभाषितकरांनी अमृताची चव चाखवीत आता बिचार्या माणसांच्या वाट्याला फक्त अमृततुल्य चहा!
जगात माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की त्याला आळस करता येतो. इतर प्राण्यांना निसर्गाने ठेवलंय तसंच राहावं लागतं. त्या आळसासंबंधीचं एक सुभाषित असं आहे – आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः।
आता सुभाषितांच्या बाबतीत एक सुभाषित असं आहे की ज्यातलं पहिलं अक्षर फक्त बदललं की अर्थात एकदम बदल होतो. ते सुभाषित असं – यथा नयति कैलासं नगं गाव सरस्वती। तथा न नयति कैलासं न गंगा न सरस्वती॥
कैलास पर्वतापर्यंत आपल्याला फक्त गान सरस्वती घेऊन जाते. कारण गान सरस्वतीला आरोह आणि अवरोह दोन्ही आहे. याउलट हिमालयातून उगम पावणार्या गंगा आणि सरस्वती या नद्या की पवित्र असल्या तरी त्या आपल्याला कैलास पर्वतापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत. कारण त्यांना फक्त अवरोह आहे, आरोह नाही.
आता एक सुभाषित आहारासंबंधी आहे. तो माणूस निरोगी राहतो. सः अरुक्। तो आहाराबाबतीत तीन नियम पाळतो. 1) हित-भुक् – म्हणजे तो हितकारक आहार घेतो. 2) मितभुक् – जो मिताहार घेतो. आपण जेव्हा पाहुण्यांना सावकाश जेव्हा असं सांगतो त्यातल्या स-अव-काश या शब्दांचा अर्थ पोटात थोडी रिकामी जागा ठेवून जेवा, असा अर्थ आहे. याउलट एक सुभाषित विनोदीपणानं असं सागतं – मिष्टान्न दुर्लभं लोके प्राणाः जन्मनि जन्मनि । प्राण काय जन्मोजन्मी मिळतीलच। मिष्टान्न कुठे सहज भेटणार?
कवी कुलगुरू कालिदासाला दीपशिखा कालिदास असे म्हटले जाते. कारण त्याने इंदुमती-स्वरातल्या राजांचं वर्णन करताना त्याच्या काळात रात्री शहरात पहारा देताना पहारेकरी मशालीचा म्हणजे दीपशिखेचा उपयोग करीत असत. ती मशाल ज्या प्रसादांच्या जवळून जाई तो तो वेगवेगळ्या सरदारांचा प्रासाद उजळून निघत असे. संचारिणी दीपशिखा इव रात्रौ। यं थं व्यतीयाय पतिवरासा। प्रासाद मार्गाद्दृ इव द्रपेदे विवर्ण भावं स स भूमिपाळः। पण याच कालिदासानं त्यात इंदुमतीचं वर्णन मानस राजहंसी असं केलं आहे. एखादी मानस सरोवरातली राजहंसी जेव्हा एखाद्या कमळाजवळ थबकू पाहाते तोच समीरपोत्य म्हणजे वार्याच्या मंद झुळुकेनं अलगद पद्यांतरं म्हणजे दुसर्या कमळाकडे नेली जाते. आता दीपशिखेपेक्षा ही त्याच कालिदासाची उपमा सरस नाही का?
आता आपण सुभाषिताच्याच माध्यमातून समस्यापूर्तीच्या प्रांतात शिरू. एक समस्या अशी ठा ठं ठठठण ठठण ठः । याची पूर्ती तेवढ्या पात्रतेच्या कवीनं केली ती अशी रामाभिषेके जलम् आहरन्त्याः। हस्तात् च्युतो हे मघटो युवत्याः॥
प्रासाद मार्गेण करोति शब्दम्। ठा ठण् ठठंठण् ठठठंठः।
एकदा तिरुपतीत संस्कृतप्रेमीचं संमेलन भरलं होते. समस्या होती –
सुधानिधैः सुधा प्राप्य सुधारुपं परीक्षितम् (प्रयोगशाळेत)
सुधातेम् (चुन्याचा लेप) सुधा भासः॥
सुधाहीनः सुधानि धिः॥