दिनमान प्रतिनिधी
विरार।
फोनवर झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने तसेच या हाणामारीत एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विरार फाटा येथे घडली.
या प्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जूचंद्र येथील रहिवाशी असलेला अक्षय पाटील आणि खार्डी येथे राहणारा विकी पाटील यांच्यात फोनवरील संभाषणातून वादाची ठिणगी पडली. याच प्रकारातून विरार फाटा येथे आलेला अक्षय आणि विकी यांच्यात विरार फाटा येथे बाचाबाची झाली. यात एकाने हवेत गोळीबार केला.
हाणामारीच्या घटनेत अक्षय पाटील हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याला पारोळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मांडवी पोलिसांना गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच मोबाइल लोकेशनवरून अक्षय आणि प्रथमेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांसह आणखी एकाला न्यायालयाकडून 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
यातील अक्षय याच्या होणार्या पत्नीसंदर्भात विचारणा करण्यासाठी विकी याने अक्षय याला विरार फाटा येथे बोलावले होेते. अक्षय आपल्या मित्रांसोबत तेथे आला असता विकी व त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी धातू फायटर व ठोशाबुक्क्यांनी अक्षयला मारहाण केली. या वेळी एकाने अक्षयवर बंदूक रोखत हवेत गोळीबार केला. पोलिसांना तिघा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असून, 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.