दिनमान प्रतिनिधी
पनवेल।
फटाक्यांचा आवाज आता दिवाळीपुरता मर्यादित राहिला नसून वाढदिवस, लग्नसमारंभ, उद्घाटन आणि राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने फटाके फोडले जात आहेत. ध्वनी व वायू प्रदूषणाचा वर्षभरातील कालावधी वाढत चालला आहे. जेवढे मोठे फटाके फोडू तेवढी प्रतिष्ठा अधिक या भावनेतून बाहेर पडण्यासाठी जनजागृतीची गरज भासू लागली आहे.
आता वर्षभर राजकीय कार्यकर्त्यांकडून अनेक सभा, नेत्यांचे स्वागत व विशेष कार्यक्रमात मोठ्या आवाजाचे फटाके वाजवले जात आहेत. राजकीय नेत्यांचे स्वागत फटाके वाजवून केले जाते.
कायदा काय म्हणतो?
पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार आणि ध्वनिप्रदूषण नियमानुसार दिवसा 55 व रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. यापेक्षा जास्त आवाजाचे फटाके वाजवल्यास कारवाई करण्याचे पोलिस व्यवस्थापनाला अधिकार आहेत. मोठ्या फटाक्यांमुळे आवाजाची तीव्रता ही 115 ते 135 डेसिबलपर्यंत जाऊ शकते.