दिनमान प्रतिनिधी
मुंबई|
भारतातील मोठ्या आणि अत्यंत विविधिकृत फायनान्शिअल सर्विसेस कंपन्यांपैकी एक बजाज फायनान्स लि. ची उपकंपनी बजाज हाउसिंग फायनान्स लि.ने होम लोन्सवर फेस्टिव्ह ऑफर घोषित केली आहे . या होम लोन्सच्या व्याज दराची सुरवात पगारदार अर्जदारासाठी दरसाल ८.४५% पासून होते. फेस्टिव्ह ऑफरमध्ये संभाव्य ग्राहकाला ह्या उद्योगातील सर्वात कमी मासिक हप्त्याचा (ईएमआय) लाभ मिळतो, ज्याची सुरुवात दर लाखामागे ७२९ रुपये आहे.
ही ऑफर ७५० किंवा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या अर्जदारांसाठी वैध आहे. होम लोनचं वाटप सप्टेंबर १३ ते १२, नोव्हेंबर २०२३ दरम्यान होईल.