दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
शहरात मेट्रो चार या मार्गिकेच्या उभारणीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान, सुमारे १५ ते २० फुट उंचावरून एक सळई रस्त्यावरुन जाणार्या वाहनात आरपार उभी शिरली. वाहन चालकापासून अवघ्या काही इंच अंतरावर ही सळई पडल्याने वाहन चालक व प्रवाशांचा जीव वाचला. परंतु या घटनेनंतर मेट्रो कामकाजात हलगर्जीचा आरोप होत आहे. (एमएमआरडीए) वडाळा-घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. लाल बहादुर शास्त्री मार्गावरही प्राधिकरणाकडून विविध कामे सुरू आहेत. सोमवारी सकाळी या मार्गावरून वाहन चालक जितेंद्र यादव हे भांडुपहून तीन प्रवाशांना घेऊन कोलशेतच्या दिशेने जात होते. त्यांचे वाहन भारत पेट्रोल पंप येथे आले असता सुमारे १५ ते २० फुट उंचावरून एक लोखंडी सळई थेट वाहनात आरपार शिरली. ही सळई वाहन चालकापासून अवघ्या काही इंच अंतरावर पडली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.