दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
विद्यार्थ्यांना तब्बल १५ हजार वह्या वाटप करून डॉ. राजेश मढवी यांनी वाढदिवस साजरा करण्याचा वेगळा पायंडा पाडला आहे, असे गौरवोद्गार आमदार निरंजन डावखरे यांनी काढले. ठाणे भाजपचे उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या आज १० जून रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील १ ली ते १५ वीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना १५ हजार वह्या आणि लाँग बुकचे मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.या उपक्रमासाठी प्रगती प्रतिष्ठानच्या सुनंदाताई पटवर्धन प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होत्या.
नौपाड्यातील भगवती शाळेजवळील भाजपच्या मा. नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष डावखरे यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर तसेच भाजप महिला आघाडी शहर अध्यक्षा मा. नगरसेविका मृणाल पेंडसे, स्थानिक मा. नगरसेविका प्रतिभा मढवी, मा. नगरसेवक सुनेश जोशी, आदींसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजेश मढवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील शेकडो ज्येष्ठ नागरीक व विद्यार्थ्यानी गर्दी केली होती. समतोल फाऊंडेशन तसेच सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांसह अनेक गरजूंना तब्बल १५ हजार वह्या व लाँगबुकचे वाटप आ. डावखरे तसेच सुनंदाताई पटवर्धन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.