अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करीत ती नेटकर्यांचं लक्ष वेधून घेत असते. त्याचसोबत दिशा तिच्या फिटनेससाठीदेखील ओळखली जाते. वर्कआउट करतानाचे किंवा तिच्या ट्रेनिंगचे विविध व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करीत असते. दिशा ही अभिनयासह मार्शल आर्ट्समध्ये तज्ज्ञ आहे. ती नेहमी स्वत:ला विविध आव्हाने देत असते. नुकतंच तिने 720 डिग्री किक मारण्याचे कठीण चॅलेंज पूर्ण केले आहे. नुकतंच दिशाने याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहायला मिळत आहे. यात दिशाने रेड बॉक्सर आणि काळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केले आहे. यानंतर ती पूर्ण ताकदीने 720 डिग्रीमध्ये किक मारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओवर अभिनेता टायगर श्रॉफनेही कमेंट केली आहे. अखेर तू हे करून दाखवलं. खूप छान, असे टायगर श्रॉफ म्हणाला. विशेष म्हणजे टायगरने या वेळी दिशाचा ट्रेनर राकेश यादव याचेही कौतुक केले आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ हा स्वत: एक मार्शल आर्ट्स खेळाडू आहे.